शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा फार्मिंग कंपनीकडून १० कोटींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:05 IST

सिक्युरिटीज अ‍ॅन्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी)कडून मनाई असताना सुविधा फार्मिंग कंपनीच्या संस्थापक व संचालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. नंतर गडचिरोली येथील शाखा कार्यालय बंद करून १० कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली.

ठळक मुद्देसंस्थापकावर गुन्हा दाखल : सेबीची मनाई असताना स्वीकारल्या ठेवी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिक्युरिटीज अ‍ॅन्ड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी)कडून मनाई असताना सुविधा फार्मिंग कंपनीच्या संस्थापक व संचालकांनी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या. नंतर गडचिरोली येथील शाखा कार्यालय बंद करून १० कोटी रुपयांनी नागरिकांची फसवणूक केली. याप्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात कंपनीच्या संस्थापकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.विनोदकुमार जमनाप्रसाद शंखवार व राजेंद्रकरण शंकरलाल राजपूत दोघेही रा.रायपूर (हल्ली मुक्काम देहरादून, उत्तराखंड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. भोपाळ येथील सुविधा फार्मिंग अ‍ॅण्ड अलॉईड कंपनीचा संस्थापक विनोदकुमार शंखवार याने गडचिरोली येथील बट्टुवार कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने जागा घेऊन तिथे कंपनीचे शाखा कार्यालय सुरू केले होते. या ठिकाणी अभिकर्त्यामार्फत ठेवीदारांकडून मोठ्या प्रमाणात रकमा गोळा केल्या. अधिक कमिशन देण्याचे आमिष दाखविल्याने अनेक गुंतवणुकदारांनी या कंपनीत पैसे गुंतविले.विशेष म्हणजे या कंपनीला अशा पद्धतीने ठेवी स्वीकारून व्यवहार करण्यासाठी सेबीने मनाई केली होती. तरी सुद्धा या कंपनीच्या संस्थापकाने लोकांची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर दोन्ही आरोपी पसार झाले. या प्रकाराच्या तक्रारी वाढल्यानंतर आरोपींच्या विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात भादंविचे कलम ४२०, ४०६, ४०९, १२० ब, ३४ अन्वये २० जुलै रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गडचिरोली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासाअंती दोन्ही आरोपींनी जवळपास १० कोटी रुपयांची नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.दोघांविरूद्ध अटक वॉरंटविनोदकुमार शंखवार व राजेंद्रकरण राजपूत या दोन्ही आरोपींविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटक वॉरन्ट जारी केला आहे. सदर आरोपी कुठे दिसून आल्यास अथवा त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत माहिती असल्यास तपास अधिकाऱ्याच्या ९८२३३९७२५५ व पोलीस नियंत्रण कक्ष ०७१३२-२२२१०० या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी