शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१७८ बंधाऱ्याचे काम अपूर्ण

By admin | Updated: November 30, 2014 23:03 IST

जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे.

सिंचनाची ऐशीतैशी : निधीअभावी ७ उपसा सिंचन योजना थंडबस्त्यातगडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. सामान्य निधी अंतर्गत ९९ बंधाऱ्याचे काम मंजूर करण्यात आले. यापैकी ६२ बंधारे पूर्ण झाले आहेत. तर या दोन्ही योजनेतील एकूण १७८ बंधारे अपूर्ण स्थितीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. निधी अभावी ७ उपसा सिंचन योजना थंडबस्त्यात आहे.जि.प.च्या सिंचाई विभागामार्फत जिल्ह्यात दरवर्षी कोल्हापुरी पध्दतीचे तसेच साठवण बध्ाांरे, लघू पाटबंधारे तलाव, उपसा सिंचन योजना व माजी मालगुजारी तलावाचे काम करण्यात येते. लघू पाटबंधारे विभागामार्फत १९८९-९० पासून ते आजपर्यंत जिल्ह्यात एकूण ५७७ बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाली असून या बंधाऱ्यांच्या माध्यमातून ३०४६७.६० घनमिटर साठवण क्षमता निर्माण झाली असून प्रकल्पीय सिंचन क्षमता १३१८२.४१ हेक्टर क्षेत्रात निर्माण झाली असल्याचे विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात १९ ल.पा. तलावाचे बांधकाम पूर्ण झाले असून या तलावांची साठवणूक क्षमता ०.८१५४४ दसलक्ष घनमिटर एवढी निर्माण झाली असून १४६०.०० हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षमता निर्माण झाली असल्याचे सिंचाई विभागाकडून सांगण्यात येत आहे. जि.प. सिंचाई विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या बंधारे, मामा तलाव व उपसा सिंचन योजनेची कामे ग्रामपंचायत प्रशासन, सुशिक्षीत बेरोजगार संघटना व कंत्राटदारांमार्फत केली जातात.आदिवासी उपयोजनेंतर्गत बंधारे बांधकामासाठी जि.प. च्या लघू पाटबंधारे विभागाला सन २०११-१२ या वर्षात ३६०.६३ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. सदर निधी पूर्ण खर्च करण्यात आला. सन २०१२-१३ या वर्षात ४४१.६० लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ४२२.२२ लक्ष रूपये कामावर खर्च करण्यात आले. सन २०१३-१४ या वर्षात ४१३.२२ लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ३१२.८३ रूपयाचा निधी खर्च झाला. सद्य:स्थितीत लघू पाटबंधारे विभागाकडे आदिवासी उपयोजनेंतर्गत ३४८.३२ लक्ष रूपयाचा निधी शिल्लक असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.मामा तलावाच्या लघू पाटबंधारे विभागाला २०११-१२ या वर्षात ४४.८३ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. यापैकी ३५.५३ लाखाचा निधी खर्च झाला. २०१२-१३ या वर्षात ५५.२० लक्ष रूपयाचा निधी प्राप्त झाला. तर ४०.२७ लक्ष रूपये खर्च झाले. मामा तलावाच्या योजनेंतर्गत लघू पाटबंधारे विभागाने ३७.३४ लक्ष रूपयाचा निधी खर्च केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)