गडचिरोली : रविवारी जिल्ह्यात १६८ नवीन कोरोनाबाधित आढळून आले, तर १७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
एकूण काेराेनाबाधितांची संख्या २८ हजार ७१० एवढी झाली आहे. त्यापैकी २६ हजार १९० जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या एक हजार ८३० जणांवर उपचार सुरू आहेत. एकूण ६९० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. सात नवीन मृत्यूमध्ये ७५ वर्षीय पुरुष गुड्डीगुडाम, ता. अहेरी, ४५ वर्षीय पुरुष माडेमगाव, ता. चामोर्शी, ७२ वर्षीय पुरुष कुलकुली, ता. आरमोरी, ७२ वर्षीय पुरुष धुंडेशिवनी, ता. गडचिरोली, ६१ वर्षीय पुरुष शाहूनगर, गडचिरोली, ५५ वर्षीय पुरुष नवेगाव, गडचिरोली, ७० वर्षीय महिला आशीर्वाद नगर, गडचिरोली यांचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२२ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ६.३७ टक्के, तर मृत्युदर २.४० टक्के झाला.
नवीन १६८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २८, अहेरी तालुक्यातील ४, आरमोरी ८, चामोर्शी तालुक्यातील ७६, धानोरा तालुक्यातील ५, एटापल्ली तालुक्यातील ३, कुरखेडा तालुक्यातील ४, मुलचेरा तालुक्यातील १७, सिरोंचा तालुक्यातील १३, तर देसाईगंज तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. तर रविवारी कोरोनामुक्त झालेल्या १७३ रुग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६३, अहेरी ३, आरमोरी २, भामरागड ६, चामोर्शी १९, धानोरा २१, एटापल्ली ९, मूलचेरा ८, सिरोंचा १८, कोरची १३, कुरखेडा १३ तसेच देसाईगंज येथील १७ जणांचा समावेश आहे.