शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

१६१ शाळांची वीज गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:46 IST

वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने जिल्हाभरातील सुमारे १६१ शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या शाळांकडे सुमारे ५ लाख ५४ हजार ७४८ रूपयांचे वीज बिल थकित आहे.

ठळक मुद्दे७ लाख ५५ हजारांची थकबाकी : वीज बिल भरताना शाळांची दमछाक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीने जिल्हाभरातील सुमारे १६१ शाळांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या शाळांकडे सुमारे ५ लाख ५४ हजार ७४८ रूपयांचे वीज बिल थकित आहे.शासनाने जवळपास सर्वच जिल्हा परिषद शाळांना वीज जोडणी सक्तीची केली आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेमध्ये वीज जोडणी झाली आहे. मात्र वीज बिल देण्यासाठी शाळेला शासनाकडून स्वतंत्र अनुदान मिळत नाही. सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून प्राथमिक शाळेला दरवर्षी पाच हजार रूपये व उच्च प्राथमिक शाळेला सात हजार रूपये अनुदान दिले जाते. या अनुदानातून शाळेचा वर्षभराचा खर्च संबंधित शिक्षकाने भागवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र पाच हजार रूपयांच्या अनुदानात शाळेचा वर्षभराचा खर्च भागविणे शक्य होत नाही. त्यातच मासिक विजेचे बिल द्यावे लागते. प्राथमिक शाळेमध्ये किमान चार वर्गांसाठी चार वर्गखोल्या राहतात. प्रत्येक वर्गखोलीत किमान एक पंखा व शिक्षकांसाठी एक पंखा असे पकडले तर पाच पंखे दिवसभर चालतात. त्याचबरोबर शैक्षणिक उपकरणे, एखादे लाईट दिवसभर सुरू राहते. परिणामी शाळेचा वीज बिल हजार ते दीड हजार रूपये एवढा येतो. एवढा खर्च शाळा अनुदानातून भागविणे शक्य होत नाही. शाळा अनुदान केवळ वीज बिलासाठीच खर्च झाला तर शाळेचा इतर खर्च कसा करायचा असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर निर्माण होतो. एखादेवेळी चुकीने अधिकचा वीज बिल आल्यास अनुदानाअभावी तो भरणेही शक्य होत नाही. परिणामी नियमानुसार महावितरण संबंधित शाळेचा वीज पुरवठा खंडित करते. डिसेंबर महिन्यापर्यंत जिल्हाभरातील सुमारे १६१ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या शाळांकडे सुमारे ७ लाख ५४ हजार ७४७ रूपयांची थकबाकी आहे.अध्यापन करताना शिक्षकांनी डिजिटल साधनांचा वापर करावा, यासाठी प्रत्येक शाळेला डिजिटल साधने खरेदी करणे सक्तीचे केले आहे. सदर साहित्य खरेदी करण्यासाठीसुद्धा शासनाने अनुदान दिले नाही. परिणामी शिक्षकांनी लोकवर्गणीतून साहित्य खरेदी केले. मात्र आता वीज पुरवठाच खंडित झाला असल्याने डिजिटल साधने शाळेतच धूळखात पडून आहेत. काही शाळांना संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र विजेअभावी सदर संगणकसुद्धा आता बंद स्थितीत आहेत. शाळेचा वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी व शिक्षकांना गर्मीतच शाळेत बसावे लागणार आहे. वीज बिल भरण्यासाठी शाळांकडे कोणताही अतिरिक्त स्त्रोत नाही. त्यामुळे शाळांचे वीज बिल भरण्याची जबाबदारी जिल्हा परिषद किंवा ग्राम पंचायतीने उचलावी, अशी मागणी आहे. अन्यथा वीज गूल होणाऱ्या शाळांच्या संख्येत भर पडणार आहे.महावितरणचे सर्वांसाठी समान नियमवीज बिलाची वाढत चाललेली थकबाकी हा महावितरणसमोरील गंभीर प्रश्न आहे. वीज उत्पादनासाठी लागलेल्या प्रत्येक वस्तूला नगदी पैसे मोजावे लागतात. मात्र वीज बिलाची वसुली प्रत्येक महिन्याला ८० ते ९० टक्क्याच्यादरम्यानच होते. त्यामुळे प्रत्येक महिन्याला वीज बिलाच्या थकबाकीचे प्रमाण वाढत जाते. प्रत्येक महिन्याला वरिष्ठ कार्यालयाकडून आढावा घेतला जातो व जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी प्रत्येक सर्कल कार्यालयाला निर्देश दिले जातात. त्यामुळे महावितरणचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी ग्राहक कोणताही असो सर्वांसाठी एकच नियम या अंतर्गत एक ते दोन महिन्याचे वीज बिल थकीत राहिल्यानंतर शाळेचाही वीज पुरवठा खंडित केला जातो. सद्यस्थितीत शाळांना व्यावसायिक मीटर लावण्यात आले असून पब्लिक सर्व्हीसेस अंतर्गत ५.३६ रूपये प्रति युनिट दराने वीज पुरवठा केला जातो. शासनाने यामध्ये सवलत देण्याची मागणी आहे. त्याचबरोबर सर्व शिक्षा अभियानने शाळा अनुदानामध्ये वाढ करावी. वाढलेल्या महागाईत पाच हजार रूपये अनुदान वर्षभर पुरत नाही.