शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांच्या शिकारप्रकरणी कसारीतील १६ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:24 IST

तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणाºया कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वन विभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले.

ठळक मुद्देविजेच्या तारांचा वापर : शिकाऱ्यासह मांस घेणाऱ्यांवरही कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव चोप : तारांमध्ये विजेचा प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करणाऱ्या कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी याच्यासह इतर १५ जणांना वन विभागाने अटक केली. मडावी याने शिकार केली तर इतर लोकांनी ते मांस विकत घेतल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले.कसारी येथील दुधराम आत्माराम मडावी हा त्याच्या शेतात तारांत विद्युत प्रवाह सोडून वन्यजीवांची शिकार करतो, अशी गोपनिय माहिती वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १९ मे रोजी मडावी याच्या शेतात जाऊन तपासणी केली. तिथे तार आढळून आले. शिकारीबाबत विचारले असता, त्याने सुरूवातीला नकार दिला. मात्र वन विभागाच्या कर्मचाºयांना मडावीवर संशय असल्याने त्याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने आपण वन्यजीवांची शिकार करीत असल्याचे मान्य केले. पुन्हा त्याच्या शेताची तपासणी केली असता, तणसाच्या ढिगात तीन रानडुकरांचे मुंडके व एक रानकुत्रा कुजलेल्या स्थितीत आढळून आला.वन विभागाच्या कर्मचाºयांनी अधिक चौकशी केल्यानंतर कसारी येथील ज्या नागरिकांना मांस विकले, अशा १५ व्यक्तींची नावे मडावी याने सांगितली. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांनी त्या १५ नागरिकांनाही अटक केली. मडावीसह इतर १५ व्यक्तींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने इतर १५ आरोपींची जामिनावर सुटका केली तर मडावी याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. सदर कारवाई उपविभागीय वनाधिकारी एस.जी. कैदलवार, वन परिक्षेत्राधिकारी आर. एम. शिंदे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी केली.अधिकची माहिती मिळविण्याचा प्रयत्नआरोपी दुधराम मडावी याच्याकडून शिकारीविषयची अधिकची माहिती मिळविण्याचा प्रयत्न वन विभागाचे कर्मचारी वनकोठडीदरम्यान करणार आहेत. त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली जाणार आहेत.