शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

१५५ गावांचा संपर्क तुटला

By admin | Updated: September 6, 2014 23:45 IST

शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्हाभर संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड

भामरागडची दूरध्वनी सेवाही ठप्प : अहेरी, भामरागडात पूरस्थिती बिकटगडचिरोली : शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्हाभर संततधार पाऊस सुरू असल्याने तसेच छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढल्याने गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, भामरागड तालुक्यातील पूर परिस्थिती बिकट झाली आहे. या दोन तालुक्यातील १५५ गावांचा संपर्क तुटलेला आहे. या तालुक्यातील अनेक पुलावर पाणी चढल्याने वाहतुकही ठप्प झाली आहे. आलापल्ली-भामरागड मार्गावरील चंद्रा नाल्याजवळ पाणी चढल्याने हा मार्ग शुक्रवारपासून बंद झाला आहे. भामरागड गावाच्या सभोवताल पाण्याने वेढा पडला असून अनेक कुटुंबांना सुरक्षीत जागी हलविण्यात आले आहे. जवळजवळ १०० वर अधिक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. शनिवारी दुपारी १ वाजतानंतर भामरागडची दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवाही ठप्प झाली आहे. अहेरीतील जुन्या मध्यवर्ती बँकेसमोरील १० ते १५ घरांमध्ये तसेच आझाद वार्ड व बाजार परिसरातील ३० ते ४० घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच अहेरी तालुक्यात अहेरीनजिकच्या गडअहेरी नाल्याच्या पुलावरून १० फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पूर परिस्थितीमुळे देवलमरी, चेरपल्ली, व्यंकटापूर, इंदाराम, पुसूकपल्ली, बामणी, अमनपल्ली आदीसह ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. नाल्यावर पाणी असल्यामुळे अहेरी-आवलमरी बसफेरी रद्द करण्यात आली आहे. जिमलगट्टानजिकच्या देचलीपेठा परिसरातही मुसळधार पावसामुळे १५ ते २० गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे. क्रिष्टापूर, डोडा आणि लिंदा या नाल्यांना पूर आला असून या परिसरातील गावांचा संपर्क तालुका मुख्यालयाशी तुटलेला आहे. जिल्ह्यात शनिवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात २२१.६ मिमी पाऊस झाला. गडचिरोली तालुक्यात ४४ मिमी, एटापल्ली १६.८, भामरागड १५३ मिमी पाऊस झाला.