शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीत १५ नवीन टॉवर

By admin | Updated: April 24, 2017 01:14 IST

नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर, रस्ते, पूल बांधकामासाठी केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने डावीकडवी विचारसरणी ग्रस्त भागाला विशेष मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

लवकरच होणार बांधकाम : केंद्राच्या गृहमंत्रालयातून निधी प्राप्त एटापल्ली : नक्षलग्रस्त भागात मोबाईल टॉवर, रस्ते, पूल बांधकामासाठी केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाने डावीकडवी विचारसरणी ग्रस्त भागाला विशेष मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. या अंतर्गत एटापल्ली तालुक्यातील दुर्गम व नक्षलग्रस्त भागात सुमारे १५ मोबाईल टॉवर मंजूर करण्यात आले आहेत. नक्षलग्रस्त भागात प्रामुख्याने दळणवळणाची साधने अत्यंत मर्यादित आहेत. याचा फायदा नक्षली घेतात. एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहप्रकल्पाला नक्षल्यांचा विरोध आहे. ही बाब लक्षात घेऊन सुरजागड पहाडाच्या सभोवताल पोलीस ठाणे उभारले जात आहेत. त्याचबरोबर ज्या परिसरात आता नेटवर्कचेही जाळे उभारण्याचे काम केले जात आहे. केंद्राचे गृहमंत्रालय बीएसएनएलच्या मार्फतीने एटापल्ली तालुक्यातील भापडा, अलेंगा, पिपलीबुर्गी, जवेली, घोटसूर, मोडस्के, इतलनार, परसलगोंदी, दोडूर, गिलनगुंडा, गेद्दा, दोडी, रेकनार, बर्डी या ठिकाणी टॉवर उभारण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी निधी सुध्दा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे बीएसएनएलच्या वतीने जागा शोधण्याचे काम सुरू झाले आहे. काही ठिकाणी तर जागाही निश्चित झाली आहे. लवकरच संबंधित गावांमध्ये मोबाईल टॉवरचे बांधकाम केले जाणार आहे. १५ मोबाईल टॉवरची भर पडणार असल्याने ग्रामीण व दुर्गम भागातही कव्हरेज उपलब्ध होणार आहे. नागरिकांना सोयीसुविधा पुरवून तसेच दळणवळणाची साधने मजबूत करून नक्षल्यांना शह देण्याचा प्रयत्न शासनाकडून चालविला जात आहे. एटापल्ली तालुक्याबरोबरच भामरागड तालुक्यात पाच, अहेरीत पाच, कोरचीत चार व धानोरात चार टॉवर मंजूर झाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)