शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसांत एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:13 IST

गडचिराेली : शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. १५ जुलैपासून ...

गडचिराेली : शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील काेराेनामुक्त गावातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. १५ जुलैपासून हे वर्ग भरविले जात असून, या वर्गाच्या जिल्हाभरातील एकूण १९४ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. १५ दिवसांत या शाळांमधील एकही विद्यार्थी काेराेनाबाधित आढळला नाही. तसेच काेणतीही शाळा बंद करावी लागली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

काेट...

विद्यार्थी मजेत, पालक समाधानी

शाळा पुन्हा सुरू झाल्याने आम्हाला प्रत्यक्ष अध्ययनाची संधी मिळाली आहे. शाळेत काेराेना संसर्गासंबंधात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे काेराेना संसर्गाची फारशी भीती नसून नियमित शाळेत जाणे आम्हाला आवडत आहे.

- प्रतीक मडावी, विद्यार्थी

.....................

गेल्या दीड वर्षानंतर पहिल्यांदा आमचे विद्यालय सुरू झाले; त्यामुळे माेठा आनंद झाला. वर्गातील मित्रांसाेबत प्रत्यक्ष वर्गात बसून शिकायला मिळत आहे. नेटवर्कअभावी अडचणी येणाऱ्या ऑनलाईन अध्ययनातून आमची सुटका झाली आहे. काेराेनाबाबत शाळेत आवश्यक काळजी घेतली जात आहे.

- मनाेज उंदीरवाडे, विद्यार्थी

...............

गेल्या एक ते दीड वर्षानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत, ही बाब चांगली आहे; परंतु काेराेना संसर्ग अद्यापही पूर्ण संपलेला नाही. शाळेच्या वतीने उचित काळजी घेतली जात असल्याने आम्हाला फारशी चिंता नाही.

- मनाेहर हिचामी, पालक

..................

जिल्ह्यात एकूण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा - २५५

सध्या सुरू असलेल्या शाळा - १९४

काेट...

काेविडमुक्त भागातील १९४ शाळांमध्ये १५ जुलैपासून इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहेत. शाळा सुरू झाल्यापासून एकाही शाळेमध्ये काेराेनाबाधित विद्यार्थी तसेच शिक्षक आढळून आलेले नाहीत. परिणामी काेराेना संसर्गामुळे एकही शाळा बंद करण्याची वेळ आली नाही. धानपीक राेवणीच्या कामामुळे विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. १५ दिवसांनंतर विद्यार्थी उपस्थिती निश्चितच वाढणार आहे.

- आर. पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि. प. गडचिराेली

बाॅक्स... विद्यार्थी उपस्थिती ४० टक्क्यांवर

शासनाच्या निर्देशानुसार गडचिराेली जिल्ह्यातील १९४ माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी शेतीचे काम सहज करतात. आईवडिलांना मदत करण्यासाठी धानपीक राेवणीच्या कामासाठी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी जात आहेत. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी झाली आहे. सुरू झालेल्या शाळांमध्ये जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थिती सध्या ४० टक्क्यांवर पाेहाेचली आहे.