शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

वाको येथे १४ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: May 3, 2017 01:45 IST

आदिवासी कंवर समाज क्षेत्र कोटगूलच्या वतीने वाको येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी केले मार्गदर्शन : आदिवासी कंवर समाजाचा उपक्रम कोरची : आदिवासी कंवर समाज क्षेत्र कोटगूलच्या वतीने वाको येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन सोमवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे १४ जोडपी विवाहबद्ध झाली. या मेळाव्याचे उद्घाटन आदिवासी कंवर समाज महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मेघराज कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सुखीराम कंवर होते. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. उपसभापती श्रावण मातलाम, कोटगूलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरीश टेकाम, बिंदूराम चंद्रवंशी, हरीराम पुजेरी, हरीशचंद्र पैकरा, रामदास हारामी, गोविंद टेकाम, डॉ. चमरू दुधकंवर, धरमदास उईके, गुलाब सोनकुकरा, अगरसिंग खडाधार, सुनेर सोनटापर, मदनसिंह करसी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. मेघराज कपूर म्हणाले, कोणत्याही समाजाचा विकास व समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर ज्या समाजातील सक्षम नेतृत्व उभे राहणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव या नेतृत्वाला असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. कंवर समाजाच्या वतीने नान्ही येथे ४२, पिंडकेपार येथे ३६, कोरची येथे २२ व वाको येथे १४ जोडपी असे एकूण ११४ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. गोविंद टेकाम यांनी शिक्षण व आरोग्यावर मार्गदर्शन केले. पेसा कायदा व त्यातून होणारा सामाजिक विकास यावर प्रकाश टाकला. सुखीराम कंवर यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्त्व पटवून दिले. विवाह सोहळ्यावरील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्यात विवाहबद्ध व्हावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्षेत्रीय अध्यक्ष लगुन कार्यपाल, गेंदलाल सोनकलस, चिंताराम सापा, भगतराम कार्यपाल, अर्जून सोनकलस, आनंद भेसरा, मिराबाई दुधकंवर, रमितबाई करसी, लिल्हार फुल्लारे, रैनसिंग साहाळा, तुकाराम कपुरडेरिया, नारद फुल्लारे यांच्यासह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमांचे मान्यवरांनी कौतुक केले. (तालुका प्रतिनिधी)