शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

१३७० गावांमध्ये झाली फवारणी

By admin | Updated: November 27, 2014 23:34 IST

गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संबंधाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जीवन नाट यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली.

साथरोगांवर आढावा बैठक : दवाखान्यातच जाऊन उपचार घ्या- जीवन नाटगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचा वाढता प्रादुर्भाव व त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या संबंधाने जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती जीवन नाट यांनी बुधवारी आढावा बैठक घेतली.या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कमलेश भंडारी, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. आर. एस. ढोले, साथरोग अधिकारी डॉ. रविंद्र चौधरी उपस्थित होते. भामरागड, धानोरा, एटापल्ली, कोरची या तालुक्यांमध्ये हिवतापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर असून कुरखेडा तालुक्यात मालेवाडा भागात प्रामुख्याने रूग्णांची संख्या अधिक आहे. अनियमित पाऊस व जास्त वेळ साचून राहिलेले पाणी यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होऊन हिवतापाचा प्रसार वाढला. जिल्ह्यामध्ये १३७० गावात किटकनाशकाची फवारणी करण्यात आली असून हिवतापाच्या रूग्णांची वाढ झालेल्या गावांसाठी स्वतंत्र कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली. आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक यांचे पथक गावामध्ये भेटी देत आहेत. औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली. तापाच्या रूग्णांनी दवाखान्यात जाऊनच उपचार घ्यावे, असे आवाहन या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष नाट यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)