शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांना १३७० दाखल्यांचे वाटप

By admin | Updated: August 3, 2014 23:23 IST

सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत भेंडाळा येथे ग्रा. पं. च्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना १३७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

चामोर्शी : सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत भेंडाळा येथे ग्रा. पं. च्या सभागृहात समाधान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या शिबिरात नागरिकांना १३७० दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्याबरोबरच १०० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.समाधान शिबिराचे उद्घाटन सरपंच लालाजी उंदीरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अशोक कुमरे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. सदस्य पार्वता कन्नाके, नायब तहसीलदार मंथनवार, पं. स. सदस्य प्रमोद भगत, रेवनाथ कुसराम, नुमचंद भिवनकर, सरपंच रत्नमाला गेडाम, सरपंच भगत, उपसरपंच अनिल सातपुते, पोलीस पाटील श्रीरंग म्हशाखेत्री, ग्रा. पं. सदस्य गजानन पोरेड्डीवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमात उत्पन्नाचे प्रमाणपत्र ७१, वंशावली सत्यापण २०, जातीचे दाखले ११, राशन कार्ड ५, कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे चेक २, सामाजिक अर्थसहाय्य योजना ४६, सातबारा ४३७, आठ अ १२५, नकाशे १३१, उत्पन्नाचे दाखले २५२, रहिवासी व जातीचे दाखले २७१ अशा एकूण १३७० दाखल्यांचे वितरण समाधान शिबिरात करण्यात आले. यावेळी आरोग्य विभागामार्फत १०० रूग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच जीवनदायी योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांना दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, वराहपालन, वैरण विकास, मुरघास तयार करणे, चारा कटाई यंत्र, असोल लागवड, पोल्ट्री फार्म, मांसलपक्षी आदी संबंधी व्यवसायाच्या योजनेविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली. कृषी विभागामार्फत पीक विमा योजना, श्री पद्धत लागवड, भातावरील कीड, कंपोस्ट खत, गांडूळ खत, बालविकास योजनेंतर्गत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांना सकस आहार देण्याविषयी माहिती देण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन नायब तहसीलदार दहिकर यांनी केले. प्रास्ताविक मंडळ अधिकारी एम. एम. सरजारे यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी एन. एस. अतकारे, डी. एस. शेडमाके, के. ए. चाटे, जयश्री कुळमेथे, अर्चना गंग्रस, कोटवार, माणिक कोडाप, रवी आत्राम, मधुकर बोदलकर, मोरेश्वर साखरे, रेवनाथ मेश्राम यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)