शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

१३३२ महिलांना लाभ

By admin | Updated: November 29, 2014 23:19 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाभरात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ या सात महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने

संस्थात्मक प्रसूती : जननी सुरक्षा योजना गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हाभरात जननी सुरक्षा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ या सात महिन्याच्या कालावधीत आरोग्य विभागाच्यावतीने संस्थात्मक प्रसूती झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील १ हजार ३३२ महिलांना लाभ देण्यात आला. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातेची प्रसुती दवाखान्यात झाल्यास ७०० रूपये व घरी पसुती झाल्यास ५०० रूपयाचा आर्थिक लाभ महिलांना दिला जातो. काही जोखीम निर्माण झाल्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागल्यास तसेच शासकीय रूग्णालयात डॉक्टरांची सेवा उपलब्ध नसल्यास खासगी मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून उपचार घेता येते. डॉक्टरांचे मानधन म्हणून १ हजार ५०० रूपये रक्कमेचा लाभ संबंधीत महिलांना दिला जातो. सदर योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी व अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील महिलांना दिला जातो. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत बाराही तालुक्यात एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर २०१४ दरम्यान विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १ हजार ४२७ गरोदर महिलांनी नोंदणी केली. यापैकी ४७० गरोदर महिलांना आशामार्फत आणण्यात आले. तर ९५७ गरोदर महिलांना ए.एन.एम. मार्फत आणण्यात आले. १४२७ गरोदर महिलांपैकी १ हजार ३३२ महिलांची संस्थेत प्रसुती झाली. तर एका महिलेचे घरी प्रसुती झाली. या महिलेला ६०० रूपयाचा लाभ देण्यात आला. जननी सुरक्षा योजनेचा लाभ जिल्हा सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयात प्रसूत झालेल्या महिलांना दिला जातो. गरोदर मातेची प्रसुती दवाखान्यातच व्हावी, जेणेकरून आरोग्याच्यादृष्टीने सोयीस्कर होईल, असे आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात येते. मात्र दुर्गम भागात वाहतुकीच्या सोयीसुविधा नसल्यामुळे अनेक गरोदर मातांची प्रसुती घरीच होते. अशावेळी नवजात बालक तसेच मातेला धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे दवाखान्यामध्येच प्रसुती होणे आरोग्याच्या दृष्टीकोणातून चांगले आहे. याकरीताच शासनाने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविण्यात येतो. यामध्ये रूग्णांना वाहतूक खर्च, मोफत औषधोपचार दिला जातो.