शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

मुस्कातील ११ शेतकरी जमीन मोबदल्यापासून वंचित

By admin | Updated: February 25, 2016 01:22 IST

येथून २० किमी अंतरावर असलेल्या मुस्का गावाला ये-जा करण्यासाठी रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या.

तीन महिन्यांपासून रक्कम पडून : एसडीओ कार्यालयातधानोरा : येथून २० किमी अंतरावर असलेल्या मुस्का गावाला ये-जा करण्यासाठी रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तब्बल ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मात्र १५ वर्षांचा कालावधी उलटूनही या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गडचिरोलीच्या वतीने सन १०९७-९८ मध्ये मुस्का गावाच्या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले. या कामासाठी ११ शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यावेळी या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळेल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी धावपळ करून मोबदल्याच्या कार्यवाहीची केली असता शासनस्तरावर याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचीही माहिती मिळाली. तेव्हा सन २००५ मध्ये सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे गोळा करून जिल्हाधिकारी यांच्याकडे लोकशाही दिनामध्ये तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाची केस दाखल झाल्याला १५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र पीडित शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळाला नाही. गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयात या प्रकरणाचा २६ सप्टेंबर २०१५ रोजी अंतिम निर्णय पारित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ गडचिरोली यांचेकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयाला २ लाख ७६ हजार ३०६ रूपयांचा धनादेश प्राप्त झाला. याला तीन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. शेतजमीन संपादित करूनही जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने ११ शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असल्याची माहिती पीडित शेतकरी नारायण गोविंदा कोल्हटकर यांनी लोकमतला दिली आहे. या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ११ शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याची रक्कम तत्काळ अदा करावी, अशी मागणी ११ शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)