शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

येनापूर बिटातील १०० टक्के विद्यार्थी प्रगत

By admin | Updated: March 23, 2016 01:52 IST

तालुक्यातील येनापूर बिटातील ५० शाळांमधील सर्वच ४ हजार ३५ विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गानुसार शैक्षणिक क्षमता

चामोर्शी : तालुक्यातील येनापूर बिटातील ५० शाळांमधील सर्वच ४ हजार ३५ विद्यार्थ्यांच्या त्या-त्या वर्गानुसार शैक्षणिक क्षमता विकसित झाल्या असल्याने या बिटाला मंगळवारी १०० टक्के प्रगत बिट म्हणून घोषित करण्यात आले. १०० टक्के प्रगत असलेले हे जिल्ह्यातील पहिले बिट असून राज्यातील चवथे बिट आहे. येनापूर बिटाअंतर्गत येणाऱ्या विठ्ठलपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन नाट यांनी सदर बिट १०० टक्के प्रगत झाले असल्याची घोषणा केली. यावेळी अध्यक्षस्थानी जि. प. सदस्य संध्या दुधबळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे, गटशिक्षणाधिकारी सहारे, शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोणे, केंद्रप्रमुख पाचपुते, नंदनवार, वडेट्टीवार यांच्यासह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना जीवन नाट यांनी कार्यक्रमापूर्वी आपण १८ मार्च रोजी मुधोली व विठ्ठलपूर येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. तेथील सर्वच विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आढळून आली. हे विद्यार्थी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी नसल्याचे दिसून आले. शाळेचा हा दर्जा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केला पाहिजे, जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. इतर शाळांनी या बिटाचा आदर्श जोपासला पाहिजे, असे मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी माणिक साखरे यांनी मार्गदर्शन करताना प्रत्येक मुलगा प्रगत बनू शकते, त्यासाठी शिक्षक, केंद्रप्रमुख यांना आपण वेळोवेळी मार्गदर्शन करीत होतो. शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतल्याने बिट प्रगत झाले आहे, असे मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)४येनापूर बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मारोती अलोणे यांनी सातारा जिल्ह्यातील कुमठे व चंद्रपूर जिल्ह्यातील टाडाळी बिटाला भेट दिली. तेथील ज्ञानरचनावादाप्रमाणे होणारे अध्यापन पद्धती समजून घेतली. त्यानंतर बिटातील शिक्षकांच्या कार्यशाळा घेऊन त्यांना ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन करण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार शाळांची रचना केली. शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली व त्यानुसार या सर्वच ५० शाळांमध्ये अध्यापन सुरू झाले. तीन महिन्यांमध्ये बिटातील संपूर्ण विद्यार्थी प्रगत झाले होते. या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गाच्या पाठ्यपुस्तकातील भाषा वाचता, लिहिता येते, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्वच गणितीय क्रिया करता येतात. जिल्ह्यातील हे पहिले बिट व राज्यातील चवथे बिट ठरल्याने जिल्ह्यासह राज्यासाठी ते आदर्श ठरले आहे. ४या बिटात जिल्हा परिषदेच्या ३४ व खासगी व्यवस्थापनाच्या १६ अशा एकूण ५० शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये १ ते ८ पर्यंत ४ हजार ३५ विद्यार्थी आहेत. या ५० शाळांमध्ये ज्ञानरचनावादाप्रमाणे अध्यापन केले जात आहे.