शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार १४८ कृषी पंपांना वीज जोडणी नाही

By admin | Updated: November 23, 2014 23:18 IST

कृषी विभागाच्या विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याबाबत एचडीपीई पाईप, ताडपत्री, धान्यकोठी, विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीची योजना २०११-१२ पासून

दिलीप दहेलकर - गडचिरोलीकृषी विभागाच्या विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत ३० हजार आदिवासी कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याबाबत एचडीपीई पाईप, ताडपत्री, धान्यकोठी, विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीची योजना २०११-१२ पासून गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये कृषी अधीक्षक कार्यालयाच्यावतीने विद्युत पंपसंच व विद्युत जोडणीसाठी बाराही तालुक्यातील एकूण १ हजार ९१६ लाभार्थ्यांपैकी मार्च २०१४ अखेरपर्यंत केवळ ३६८ लाभार्थ्यांच्या कृषी पंपाना महावितरणच्यावतीने विद्युत जोडणी करण्यात आली. कृषी अधीक्षक कार्यालयाने सर्व लाभार्थ्यांच्या विद्युत जोडणीचे महावितरणला लाखो रूपये अदा केले आहेत. मात्र अद्यापही १ हजार १४८ कृषीपंपाना वीज जोडणी करण्यात आली नसल्याचे वास्तव उजेडात आले आहे. वीज जोडणी अभावी शेतकरी संकटाचा सामना करीत आहेत.विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत नक्षलग्रस्त भागामध्ये विशेष योजना राबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली. या योजनेंतर्गत सन २०१२-१३ मध्ये जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्यावतीने आदिवासी शेतकऱ्यांचे कृषीपंपसंच व जोडणीसाठी अर्ज मागविण्यात आले. या योजनेकरीता बाराही तालुक्यातील एकूण २ हजार ५८६ आदिवासी शेतकऱ्यांचे अर्ज कृषी अधीक्षक कार्यालयाला प्राप्त झाले. यापैकी कृषी अधीक्षक कार्यालयाने ६६९ लाभार्थी वीज जोडणीकरीता अपात्र ठरवून १ हजार ९२० लाभार्थ्यांची निवड केली. यातून १ हजार ९१६ कृषीपंप मिळालेले लाभार्थी वीज जोडणीसाठी पात्र ठरविले. १ हजार ९१६ पैकी मार्च २०१४ अखेरपर्यंत महावितरणने केवळ ३६८ लाभार्थी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला वीज जोडणी करून दिली. उर्वरित १ हजार ५४८ कृषीपंप लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत जवळपास ४०० कृषीपंपाना वीज जोडणी करण्यात आल्याची माहिती आहे. शासनाचा निधी मिळाल्यानंतर कृषी विभागाने महावितरणला विद्युत जोडणीकरीता लाखो रूपये अदा केले. मात्र महावितरणच्यावतीने विद्युत जोडणीचे काम अतिशय मंदगतीने सुरू असल्यामुळे लाभार्थी शेतकरी जोडणीच्या प्रतीक्षेतच आहे. विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाला एकूण १५०० लाख रूपयाचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी आदिवासी लाभार्थी शेतकऱ्यांच्या एचडीपीई पाईप, इंजिन, ताडपत्री, धान्यकोटी, विद्युतपंपसंच व विद्युत जोडणीच्या कामासाठी २०११-१२ मध्ये ४,११.२८ लाख रूपये खर्च झाले. २०१२-१३ या वर्षात ५,००.७४ लाख रूपये या सर्व योजनांवर खर्च करण्यात आले. २०१३-१४ या वर्षी ३,५६.९८ लाख रूपये खर्च झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. २०११ पासून तर २०१४ मार्च अखेरपर्यंत १२,६९.०० लाख रूपये खर्च झाले आहेत. तर एकूण अनुदान रक्कमेपैकी २.३१ लाख रूपये शिल्लक असल्याची माहिती आहे. महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो रूपये खर्च करूनही आदिवासी शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित आहे.