शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

फ्रान्सचे सलग तिस-या विजयाचे लक्ष्य, होंडुरसविरोधात लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:30 IST

नॉकआऊटमध्ये आपली जागा पक्की केलेला फ्रान्सचा संघ होंडुरसविरोधात उद्या ग्रुप ई मध्ये खेळणार आहे. साखळी फेरीत सलग तिसरा सामना जिंकण्याचे फ्रान्सच्या संघाचे लक्ष्य आहे.

गुवाहाटी : नॉकआऊटमध्ये आपली जागा पक्की केलेला फ्रान्सचा संघ होंडुरसविरोधात उद्या ग्रुप ई मध्ये खेळणार आहे. साखळी फेरीत सलग तिसरा सामना जिंकण्याचे फ्रान्सच्या संघाचे लक्ष्य आहे.सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर फ्रान्सचा संघ उपउपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. संघाने आपला पहिला सामना न्यू कॅलिडोनियाविरोधात ७-१ असा जिंकला. त्यानंतर जापानवर २-१ ने विजय मिळवला. होंडुरसला पराभूत केल्यानंतर फ्रान्सचा संघ गटात अव्वलस्थानी कायम राहील, त्यामुळे हा संघ अंतिम १६ मध्ये पदक तालिकेत सर्वात खालच्या स्थानावर असलेल्या संघाशी खेळेल.फ्रान्सचा अमिन गोइरी फॉर्ममध्ये आहे. त्याने याआधीच्या सामन्यात न्यू कॅलिडोनिया आणि जापानविरोधात प्रत्येकी दोन गोल केले आहेत. उद्याच्या सामन्यात फ्रान्सचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार आहे यात शंका नाही.दुसरीकडे होंडुरसला विजयासाठी चमत्कार दाखवण्याची गरज आहे. होंडुरसने न्यू कॅलिडोनियाला ५-० ने पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. कार्लोस मेजिया आणि पॅट्रिक पालासिओस यांनी न्यू कॅलिडोनियाविरोधात प्रत्येकी दोन गोल केले. त्यामुळे संघाला चांगल्या खेळाची अपेक्षा आहे. उद्याच्या सामन्यात कमी अंतराने झालेला पराभवदेखील होंडुरसला बाद फेरीत जागा मिळवून देऊ शकतो.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Footballफुटबॉल