शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : उपांत्य फेरीत पाचव्यांदा युरोपियन्सची ‘किक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 09:00 IST

फुटबॉल विश्वचषक ही संकल्पना सर्वात आधी दक्षिण अमेरिकेत उदयास आली. त्यामुळेच पहिली स्पर्धा १९३० साली दक्षिण अमेरिकेतील उरुग्वेमध्ये भरली व तो विश्वचषक उरुग्वेनेच पटकावला.

ठळक मुद्दे१९९८ पासूनचा विश्वचषक हा ‘मॉडर्न फुटबॉल’ म्हणून नावारुपास आला. या ‘मॉडर्न’ काळातील स्पर्धेत २००६ मध्ये पुन्हा दक्षिण अमेरिकन संघांना उपांत्य फेरीआधी बाहेर पडावे लागले.

चिन्मय काळे :फुटबॉल विश्वचषकात आजपासून उपांत्य फेरीचे सामने सुरू होत आहेत. २१ विश्वचषकांमधील ८८ वर्षांच्या इतिहासात पाचव्यांदा उपांत्य फेरीतील चारही संघ हे युरोपातील आहेत. विश्वचषकाच्या दोन वर्षे आधी होणारा युरो चषकाला ‘मिनी विश्वचषक’ का म्हणतात, त्याचा प्रयत्य यातून येतो. धनाढ्य क्लब्समुळे फुटबॉल जगतात युरोपातील संघांचा दबदबा असतो. या युरोपियन संघांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘फाइट’ देण्याची ताकद आजवर केवळ दक्षिण अमेरिकन संघांनी दाखवली आहे. पण आधीच्या चार विश्वचषकांप्रमाणे यंदा युरोपियन संघांसमोर दक्षिण अमेरिकन संघ निष्प्रभ झाले. १२ वर्षांनी ही स्थिती निर्माण झाली आहे.

फुटबॉल विश्वचषक ही संकल्पना सर्वात आधी दक्षिण अमेरिकेत उदयास आली. त्यामुळेच पहिली स्पर्धा १९३० साली दक्षिण अमेरिकेतील उरुग्वेमध्ये भरली व तो विश्वचषक उरुग्वेनेच पटकावला. पण त्यानंतरच्या दुसऱ्याच विश्वचषकात झेकोस्लोव्हाकिया व आॅस्ट्रिया या दोन संघांनी अनपेक्षित मुसंडी मारल्याने अंतिम चारही संघ इटली व पश्चिम जर्मनीसह युरोपियन होते. त्यानंतर अशीच स्थिती १९६६ मध्ये निर्माण झाली. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा भरलेली ही स्पर्धा इंग्लंडनेच जिंकली. त्याखेरीज उपांत्य फेरीतील पश्चिम जर्मनी, पोर्तुगाल व सोव्हिएत रशिया हे अन्य तीनही संघ युरोपियन होते. पुढे १९८२ मध्ये युरोपातीलच फ्रान्सच्या भूमित भरलेल्या या स्पर्धेतील इटली, पश्चिम जर्मनी, पोलंड व फ्रान्स हे अंतिम चार संघ युरोपियन होते.

पहिल्या विश्वचषकापासून ते १९९४ पर्यंत स्पर्धेत सुरूवातीला १६ व त्यानंतर २४ संघांना पात्र केले जात होते. पण १९९८ पासून हा आकडा ३२ वर नेण्यात आला. १९९८ पासूनचा विश्वचषक हा ‘मॉडर्न फुटबॉल’ म्हणून नावारुपास आला. या ‘मॉडर्न’ काळातील स्पर्धेत २००६ मध्ये पुन्हा दक्षिण अमेरिकन संघांना उपांत्य फेरीआधी बाहेर पडावे लागले. इटली विरुद्ध फ्रान्स यांच्यातील अंतिम सामन्याखेरीज जर्मनी व पोर्तुगाल असे सर्व युरोपियन संघ त्यावेळी उपांत्य फेरीत होते. त्यानंतर आता फ्रान्स विरुद्ध बेल्जियम व क्रोएशिया विरुद्ध इंग्लंड असे चारही युरोपियन या स्पर्धेत आहेत.

दक्षिण अमेरिका फक्त दोनदा अंतिम फेरीतमागील ६८ वर्षात दोन दक्षिण अमेरिकन संघ अंतिम सामन्यात कधीच आमने-सामने आलेले नाहीत. याआधी असे केवळ दोन वेळा झाले आहे. १९३० मध्ये उरुग्वे विरुद्ध अर्जेंटीना व त्यानंतर १९५० मध्ये उरुग्वे विरुद्ध ब्राझील अशी अंतिम लढत झाली. विशेष म्हणजे त्या दोन्ही लढती उरुग्वेने जिंकल्या होत्या.

१९३० युरोपियन्ससाठी सर्वात वाईट१९३० च्या पहिल्या विश्वचषकात युरोपियन संघांची कामगिरी सर्वात खराब राहीली. त्या स्पर्धेतील अंतिम चार संघांमध्ये युगोस्लाव्हीया हा एकमेव संघ युरोपाचे प्रतिनिधीत्त्व करीत होता. त्यानंतर २०१८ पर्यंत आजवर अशी स्थिती कधीच आली नाही. त्या स्पर्धेत चौथा संघ अमेरिकेचा होता, हे विशेष. याखेरीज दक्षिण कोरियाच्या रुपात आशियाने २००२ मध्ये अंतिम चार संघात स्थान मिळवले. पण २००२ खेरीज एकाही विश्वचषकात आशियन देश उपांत्य फेरीपर्यंत पोहोचले नाहीत. आफ्रिकन देश तर एकदाही अंतिम चार संघात राहीलेले नाहीत.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८UruguayUruguayGermanyजर्मनीPortugalपोर्तुगालItalyइटलीEnglandइंग्लंड