शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

ब्रेवस्टरने इंग्लंडला पोहोचवले फायनलमध्ये, ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:20 IST

कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करताना फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

कोलकाता : रियान ब्रेवस्टरने आपल्या जबरदस्त कामगिरीत सातत्य ठेवताना आज येथे स्पर्धेत दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. त्याच्या या जबरदस्त कामगिरीच्या बळावर इंग्लंडने विजेतेपदाचा प्रबळ दावेदार आणि प्रेक्षकांचा लाडका संघ असणा-या ब्राझीलला ३-१ गोलने पराभूत करताना फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.याआधी अमेरिकेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत हॅट्ट्रिक नोंदवणा-या ब्रेवस्टरने १० व्या, ३९ व्या आणि ७७ व्या मिनिटाला असे तीन गोल करताना विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर प्रचंड संख्येने उपस्थित असणाºया ब्राझीलच्या चाहत्यांना निराश केले. ब्राझीलकडून एकमेव गोल वेस्ले याने २१ व्या मिनिटाला केला.इंग्लंड संघाने प्रथमच अंडर १७ फिफा वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत धडक मारली, तर तीन वेळेसच्या चॅम्पियन ब्राझीलचे २००३ नंतर प्रथमच विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न भंगले. इंग्लंड शनिवारी येथे होणाºया फायनलमध्ये स्पेन आणि माली यांच्यातील दुसºया उपांत्य फेरीत विजयी ठरणाºया संघाविरुद्ध खेळेल.आजचा उपांत्य फेरीचा सामना याआधी गुवाहाटी येथे खेळवला जाणार होता; परंतु अखेरच्या क्षणी कोलकाता येथे हा सामना स्थलांतरित करण्यात आला. त्यानंतरही येथे या सामन्यासाठी ६३ हजार ८८१ फुटबॉल चाहत्यांनी गर्दी केली होती. प्रेक्षकांकडून ब्राझीलला जबरदस्त पाठिंबा मिळत होता; परंतु इंग्लंडचा संघ आणि त्यांच्या निवडक पाठीराख्यांवर याचा फारसा परिणाम झाला नाही. कारण त्यांच्या संघाने जबरदस्त खेळ केला. इंग्लंडचा मिडफिल्डर एमिली स्मिथ रोवदेखील आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी येथे उपस्थित होता.पाठीराख्यांचा जबरदस्त पाठिंबादेखील ब्राझीलच्या खेळाडूंकडून त्यांची सर्वोत्तम कामगिरी करवून घेऊ शकला नाही. लिव्हरपूलचा स्ट्रायकर ब्रेवस्टरने कॅलम हडसन ओडाइच्या क्रॉसवर रिबाऊंडवर गोल करीत इंग्लंडला दहाव्या मिनिटांतच आघाडी मिळवून दिली.तथापि, ब्राझीलने वेस्लेच्या गोलवर बरोबरी साधताना सामन्यात रोमहर्षकता वाढवली. इंग्लंडचा गोलकिपर कुर्टिस अँडरसनने पालिन्होचा शक्तिशाली शॉट रोखला; परंतु वेस्लेच्या शॉटचे त्यांच्याजवळ कोणतेही उत्तर नव्हते.सामन्यातील रोमहर्षकता शिगेला पोहोचली असतानाच ब्रेवस्टरने स्टीव्ह सेसेगननच्या क्रॉसवर गोल करीत इंग्लंडची पुन्हा आघाडी वाढवली. हा त्याचा स्पर्धेतील सहावा गोल होता. या गोलमुळे स्पर्धेतील सर्वाधिक गोलही त्याच्या नावावर लागले. मध्यंतरापर्यंत इंग्लंडचा संघ २-१ गोलने आघाडीवर होता. तथापि, जर्मनीविरुद्ध उत्तरार्धात जबरदस्त मुसंडी मारत दोन गोल केल्यामुळे ब्राझीलच्या पाठिराख्यांना हा संघ पुन्हा मुसंडी मारून चमत्कार दाखवील, अशी आशा होती; परंतु इंग्लंडने जर्मनीसारखी चूक केली नाही आणि आपली पूर्ण ताकद गोल वाचवण्यासाठी लावली. ब्राझीलने बरोबरीचा गोल करण्यासाठी केलेली घाई त्यांना नडली. कारण त्यामुळे त्यांचा बचाव कमजोर पडला. ब्रेवस्टरने याचा अचूक लाभ घेताना स्थानापन्न एमिले स्मिथ रोव्हच्या खाली राहिलेल्या क्रॉसवर आपला तिसरा गोल केला. ब्राझीलला आता तिसºया स्थानासाठी सामना खेळावा लागणार आहे.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017