शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

एक ग्लासभर जिर्याचं पाणी प्यायल्यास दिवसभर पोटाच्या विकारापासून सुटका होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 19:30 IST

सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास जिर्याचं पाणी प्यायल्यास अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासरख्या त्रासातून मुक्तता तर होतेच शिवाय शरीराची सर्व कामं वेळेच्या वेळी उत्तम पार पडतात.

ठळक मुद्दे* जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो.* बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो.* शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं.

- माधुरी पेठकर.अ‍ॅसिडिटी, पोटफुगी, जळजळ, मळमळ , अपचन यासारखे पोटाचे विकार दिसायला छोटे दिसतात. पण दिवसाचे चोवीस तास बेजार करतात. दिवसभर या त्रासांनी त्रस्त राहण्याापेक्षा दिवसाच्या सुरूवातीलाच त्यावर उपाय केला तर?याउपायासाठी स्वयंपाकघरातील जिरे मोठं काम करतात. त्यासाठी करायचं एकच. सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात थोडे जीरे घालून पाणी चांगलं उकळावं. पाणी चांगलं उकळलं की गॅस बंद करावा. पाणी गार होवू द्यावं. आणि रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं. एक ग्लासभरून जिर्याचं पाणी घेतल्यास अनेक फायदे होतात.

 

जिर्याचं पाणी प्यावं कारण..1) जिर्याच्या पाण्याचा पोटासाठी खूप उपयोग होतो. अपचन, पित्त, पोटफुगी यापासून आराम मिळतो. जिर्याचं पाणी वेदनाशामक म्हणूनही काम करतं. पोटातल्या चमका, ओटीपोटातल्या वेदना या पाण्यामुळे बर्या  होतात.2) गर्भावस्थेत जिर्याच्या पाण्याचा पचनासाठी मोठा उपयोग होतो.  कार्बोहायड्रेटस आणि फॅटसच्या पचनासाठी उपयुक्त विकरांना प्रोत्साहन देण्याचं काम जिर्याचं पाणी करतं आणि या अवस्थेत पचनाचे विकार होत नाही.3) बाळांतपणानंतर दूध येण्यासाठीही जिर्याच्या पाण्याचा उपयोग होतो. स्तनातील दूधग्रंथी या पाण्यामुळे कार्यरत होवून मातेच्या दूधाचं प्रमाण वाढतं.4) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात जीरे मोठी भूमिका पार पाडतात. शरीरातील रोगप्रतिकारक व्यवस्थेचं काम जिर्याच्या पाण्याच्या सेवनानं सुधारतं. हे पाणी जर नियमित सेवन केलं तर आजारी पडण्याचं प्रमाण खूपच कमी होतं.5) सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी जिर्याचं पाणी नियमितपणे प्यायल्यास त्याचा उपयोग रक्तातील साखर कमी करण्यास होतो.6) श्वसविकारात जिर्याचं पाणी उपयुक्त ठरतं. श्वसननलिकेतले अडथळे हे पाणी काढून टाकतं. तसेच छातीत चिकट स्त्राव साठू देत नाही. त्याचा फायदा दम्याच्या रूग्णांना होतो.7) जिर्यामध्ये पोटॅशिअम असतं. हे खनिज शरीराच्या क्रिया उत्तम पार पाडण्यात उपयोगी असतं. रक्तातील मीठाचे नकारात्मक परिणाम घालवून रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचं काम जिर्याचं पाणी करतं.8) ज्यांना कोणाला दिवसभर मलूल वाटत असतं त्यांची ऊर्जा ही जिर्याच्या पाण्यानं वाढू शकते.9) जिर्याचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतं. जिर्याच्या पाण्यामुळे किडनीचं काम सुधारतं.