शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

तुम्ही मीठ जास्त खाता का? हे वाचा आणि मीठ प्रमाणात खाण्याचा निश्चय आजच करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 18:44 IST

कुशल स्वयंपाकी, आहारतज्ञ्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक मीठाचं महत्त्व मान्य करूनही आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणशीरच असायला हवं यावर भर देतात. अती मीठ खाण्याची सवय तुमचा घात करू शकते.

ठळक मुद्दे* हा अभ्यास किंवा खरंतर कोणताच अभ्यास, संशोधन, डॉक्टर किंवा आहारतज्ञ्ज्ञ मीठ खाऊ नका असं म्हणत नाही. पण मीठ कमी प्रमाणात खाल्लं तर शरीरावर अती मीठाचे परिणाम होणार नाही.* आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणबध्द किंवा कमी ठेवून हदयविकाराचा हा धोका आटोक्यात ठेवू शकतो.* लठठपणा यामागे अती मीठ सेवन हे कारण असतं.

माधुरी पेठकरमीठ एक जीवनावश्यक घटक. मीठाशिवाय पदार्थ हा विचार करणंही शक्य नाही. पण अनेकांना प्रमाणापेक्षा मीठ जास्त खाण्याची सवय असते. कोणी मूळ पदार्थच थोडा खारट करतात तर अनेकजण चव आली नाही की वरून घेवून मीठ खातात. कुशल स्वयंपाकी, आहारतज्ञ्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक आणि संशोधक मीठाचं महत्त्व मान्य करूनही आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणशीरच असायला हवं यावर भर देतात.मीठावर झालेले अनेक संशोधनं आणि अभ्यास मीठ जास्त खाल्ल्यास काय दुष्परिणाम होतात, शरीरात नेमकं काय विपरित आणि अनैसर्गिक घडतं हे सांगत आहे. लंडनमध्ये मीठाच्या बाबतीत नुकताच एक अभ्यास करण्यात आला. त्यात जास्त मीठ सेवन केल्यास तहान कमी होवून भूक वाढते. असं म्हटलं आहे. शरीरात अनावश्यक पाणी केवळ मीठाच्या अतिप्रमाणामुळे साठून राहातं. आहारातील मीठाचं जास्त प्रमाण किडनीच्या कामावर वाईट परिणाम करतं.हा अभ्यास किंवा खरंतर कोणताच अभ्यास, संशोधन, डॉक्टर किंवा आहारतज्ञ्ज्ञ मीठ खाऊ नका असं म्हणत नाही. पण मीठ कमी प्रमाणात खाल्लं तर शरीरावर अती मीठाचे परिणाम होणार नाही. अती मीठ खाल्ल्याचे दुष्परिणाम वाचले तर कदाचित तुमची जास्तीचं मीठ खाण्याची सवय नक्की कमी होईल. 

अती मीठाचे दुष्परिणाम1) अती प्रमाणात मीठ खाल्ल्यास प्रसंगी मृत्यूही ओढावतो. पोटाचा कर्करोग, स्मृतीभ्रंश, अती लठ्ठपणा, आॅस्टोपोरोसिस, मूतखडे आणि किडनीचे इतर गंभीर आजारांचं मूळ मीठ खाण्याच्या प्रमाणात असतं.2) ब्रेन स्ट्रोकच्या कारणांमध्येही मीठाचं अतीप्रमाण हे कारण सांगितलं जातं. उच्च रक्तदाबामुळे ब्रेन स्ट्रोक येतो. या उच्च रक्तदाबाचं कारण अती प्रमाणात खाल्लेलं मीठ हे असतं.

3) ब्लॉकेजेसमुळे होणारे हदयविकार हे ही अती मीठाचे परिणाम आहेत. हदयाकडे रक्त वाहून नेणार्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस आले तर हदयाला रक्तपुरवठा होत नाही. त्याचा परिणाम म्हणून हार्टअ‍ॅटॅक येतो. उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांना सूज येते. त्यामुळे त्या पुरेसा रक्तपुरवठा ह्रदयाला करू शकत नाही. आहारात मीठाचं प्रमाण प्रमाणबध्द किंवा कमी ठेवून हदयविकाराचा हा धोका आटोक्यात ठेवू शकतो.4) लठठपणा यामागे मीठाचं अती प्रमाण हे कारण असतं. लठ्ठपणामुळे रक्तदाब, ह्रदयविकार मधुमेह, झोपेचे विकार, यासारखे आजार जडतात. लठ्ठपणा आणि हे सर्व आजारांचं मूळ मीठ असू शकतं. आहारात मीठ जास्त खाण्याची सवय असेल तर मग आहाराचं प्रमाण वाढतं. आणि खाण्याच्या आवडीमध्ये अती साखर आणि मीठ असलेले पदार्थ खाल्ले जातात. यामुळे वजन पटकन वाढतं.

हे सर्व आजार टाळून सुरक्षित आणि आनंदी जगायचं असेल तर मीठ कमी खायला हवं असं आपण आपल्यालाच बजावायला हवं !