'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 11:10 IST2024-07-05T11:09:45+5:302024-07-05T11:10:05+5:30

'मिर्झापूर 3' मध्ये पंचायतमधील सचिवजी अर्थात जितेंद्र कुमार दिसणार की नाही याविषयी चर्चा होत्या. अखेर सत्य काय आहे जाणून घ्या (mirzapur 3)

panchayat fame sachivji aka actor jitendra kumar seen in Mirzapur 3 know details | 'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच

'मिर्झापूर 3'मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार ही अफवा की सत्य? अखेर खुलासा झालाच

'मिर्झापूर 3' वेबसीरिज आज रिलीज झाली. रात्री १२ वाजता 'मिर्झापूर 3' रिलीज झाली. अनेक जणांनी रात्रीच ही सीरिज बिंगवॉच केली. एका दमात काही जणांनी या वेबसीरिजचे दहा भाग बघून काढले असतील यात शंका नाही. 'मिर्झापूर 3' मध्ये 'पंचायत'मधील सचिवजी दिसणार की नाही, याविषयी अनेक चर्चा आणि बातम्या समोर आल्या होत्या. पण सचिवजी 'मिर्झापूर 3' मध्ये खरंच आहेत की नाही, याविषयीचं सत्य समोर आलंय. 

'मिर्झापूर 3'मध्ये सचिवजी आहेत की नाही?

'मिर्झापूर 3'मध्ये पंचायतमधील सचिवजी कालिन भैय्याच्या डेथ सर्टिफिकेटसाठी येतात अशी चर्चा होती. पहिल्या दोन भागांमध्ये सचिवजी दिसणार, असं सांगितलं जात होतं. परंतु 'मिर्झापूर 3' पाहिल्यावर लक्षात आलं की ही एक निव्वळ अफवा होती. 'मिर्झापूर 3'च्या कोणत्याही भागात सचिवजींचं दर्शन होत नाहीय. सचिवजींच्या येण्याने 'मिर्झापूर' आणि 'पंचायत' या वेबसीरिजचं क्रॉस प्रमोशन होणार असं सांगितलं जात होतं. स्वतः 'मिर्झापूर' फेम अभिनेता अली फजलने एका मुलाखतीत सचिवजी पहिल्या दोन भागांमध्ये दिसतील असं म्हणाला होता. परंतु असं काहीही होताना दिसलं नाही.

सचिवजी विशेष व्हिडीओत दिसणार?

एखादी वेबसीरिज रिलीज झाल्यावर प्राईम व्हिडीओ त्या वेबसीरिजचे छोटे छोटे विशेष व्हिडीओ युट्यूब आणि इतर समाजमाध्यमांवर रिलीज करतात. त्यामुळे 'मिर्झापूर 3' रिलीज झाल्यावर प्रमोशनचा भाग म्हणून करण्यात आलेल्या विशेष व्हिडीओत सचिवजी दिसणार का, अशीही चर्चा रंगली आहे. सत्य काय याचा खुलासा लवकरच होईल. पण 'मिर्झापूर 3' वेबसीरिजमध्ये मात्र सचिवजी नाहीत, हे मात्र खरं. 

Web Title: panchayat fame sachivji aka actor jitendra kumar seen in Mirzapur 3 know details