Video: 'फॅमिली मॅन'च्या जेकेने गायलं 'लाजून हासणे' मराठी गाणं; अवधूत गुप्ते कमेंट करत म्हणाला- "मित्रा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 12:47 IST2025-12-05T12:44:08+5:302025-12-05T12:47:51+5:30
द फॅमिली मॅन सीरिजच्या जेकेने अर्थात शरीब हाश्मीने मराठी गाणं गाऊन सर्वांना चकीत केलं. त्यावर अवधूत गुप्तेने केलेली कमेंट चर्चेत आहे

Video: 'फॅमिली मॅन'च्या जेकेने गायलं 'लाजून हासणे' मराठी गाणं; अवधूत गुप्ते कमेंट करत म्हणाला- "मित्रा..."
'द फॅमिली मॅन' ही वेबसीरिज चांगलीच गाजली. काहीच दिवसांपूर्वी या वेबसीरिजचा तिसरा सीझन रिलीज झाला. तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 'द फॅमिली मॅन' सीरिजमधील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. सीरिजमध्ये प्रेक्षकांनी प्रेम केलेलं असंच एक कॅरेक्टर म्हणजे जेके. 'द फॅमिली मॅन' मधील जेके तळपदे अर्थात अभिनेता शरीब हाश्मीने सोशल मीडियावर 'लाजून हासणे अन्' हे प्रसिद्ध मराठी गाणं गायलं आहे. यावर अवधूत गुप्तेने केलेली कमेंट चर्चेत आहे
जेकेने गायलं मराठी गाणं, अवधूत म्हणाला...
अभिनेता शरीब हाश्मीने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो अत्यंत सुंदर आवाजात 'लाजून हासणे अन्' हे मराठी गाणं गाताना दिसतोय. शरीबचे मराठी उच्चार आणि त्याचा आवाज ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत. 'द फॅमिली मॅन'चा जेके अभिनयात उत्कृष्ट आहेच. पण शरीबने गायलेलं हे सुंदर मराठी गाणं ऐकून चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. अनेकांनी शरीबच्या सुमधुर गायनाचं कौतुक केलंय.
अशातच मराठी गायक-संगीतकार अवधूत गुप्तेने शरीबचं गाणं ऐकून कमेंट केली आहे. अवधूत लिहितो, ''मित्रा तोडलस्स!.'' पुढे अवधूतने लव्ह इमोजी वापरुन शरीबच्या गाण्याला पसंती दिली आहे. याशिवाय मराठी अभिनेत्री कल्याणी मुळेने कमेंट करत लिहिलंय की, ''खूप खूप सुंदर... कमाल... खूप प्रेम'', अशाप्रकारे शरीबच्या गाण्याला मराठी कलाकारांनी प्रेम दर्शवलं आहे. शरीबच्या गाण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.