VIDEO : कॅप्टन कूल ' धोनी'च्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
By Admin | Updated: August 12, 2016 08:59 IST2016-08-12T08:57:46+5:302016-08-12T08:59:51+5:30
भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी व कूल महेंद्रसिंग धोनीच्या आयुष्यावर आधारित 'एम.एस. धोनी: दि अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला.

VIDEO : कॅप्टन कूल ' धोनी'च्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी व कूल अशी ओळख असणा-या महेंद्रसिंग धोनी याच्या आयुष्यावर आधारित 'एम.एस. धोनी: दि अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत या चित्रपटात मुख्य (धोनीची) भूमिका साकारत असून 'ए वेन्सडे' सारखा सुंदर चित्रपट देणा-या नीरज पांडेनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
रांची सारख्या एका शहरात राहणा-या धोनीचा तिकीट चेकरपासून ते भारतीय क्रिकेट विश्वातील सर्वात लोकप्रिय खेळाडू व कॅप्टन बनण्याचा प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. सुशांत सिंग राजपूतशिवाय अनुपम खेर, भूमिका चावला यांनीही या चित्रपटा प्रमुख भूमिका बजावल्या आहेत. ३० सप्टेंबर सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून रसिकांमध्ये चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता आहे.