विराटने अनुष्काला केलं बाय - बाय

By Admin | Updated: June 3, 2016 13:21 IST2016-06-03T11:32:15+5:302016-06-03T13:21:36+5:30

'सुलतान' चित्रपटाच्या शुटींगसाठी बुडापेस्टला जाणा-या अनुष्काला सोडण्यासाठी स्वत: विराट कोहली विमानतळावर आला होता

Vichare did the following bye-bye | विराटने अनुष्काला केलं बाय - बाय

विराटने अनुष्काला केलं बाय - बाय

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 03 - कथित ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एकत्र आलेले लव्हबर्ड्स विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात पुन्हा जवळीक वाढू लागली आहे. चित्रपटाच्या शुटींगसाठी अनुष्का नुकतीच बुडापेस्टला रवाना झाली आणि तिला निरोप देण्यासाठी विराट चक्क एअरपोर्टवर आला होता. निघण्यापूर्वी ते दोघे गाडीत बराच वेळ बोलतानाचे फोटो प्रसिद्ध झाले असून एकमेकांना सो़डून जाण्याचे दु:ख दोघांच्याही चेहे-यावर स्पष्ट दिसत होते. या फोटोंवरून त्या दोघांमध्ये पुन्हा एकदा सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत असून त्यांच्या चाहत्यांना नक्कीच खूप आनंद झाला असणार..!
 
(सोशल मिडीयावर विराट पुन्हा अनुष्काचा फॉलोअर)
 
गेल्या काही दिवसांमध्ये विराट आणि अनुष्का दुस-यांदा एकत्र दिसले आहेत. 18 मे रोजी बॉलिवूड इन्स्टाग्रामने अनुष्का आणि विराटचा फोटो शेअर केला होता. एप्रिल महिन्यातही मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये दोघे डिनर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. ब्रेकअप झाल्याच्या काही महिन्यानंतर लगेचच दोघे एकत्र दिसले होते त्यामुळे दोघांचे सूर पुन्हा जुळल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. 
 
(विराट-अनुष्काचे पॅचअप? मुंबईत केले सिक्रेट डिनर..!)
 
अनुष्का आणि विराट कोहली 2013 पासून डेटींग करत होते. पण 2016 मध्ये दोघांनी ब्रेकअप केलं होतं. विराट कोहलीने त्यानंतर सोशल मिडियावर अनुष्काला अनफॉलो करत 'हार्टब्रोकन' असा मेसेजही टाकला होता, जो नंतर त्याने डिलीट केला. दोघांना एकत्र आणण्यामध्ये सलमान खानने एकत्र आणण्यात महत्वाची भुमिका बजावली असल्याचं समजत आहे. 
झोया अख्तरच्या दिल धडकने दो चित्रपटात अनुष्का शेवटची दिसली होती. सध्या ती ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूरसोबत ए दिल है मुश्कील चित्रपटाचं शुटिंग करत आहे. याव्यतिरिक्त फिलौरी चित्रपटातही व्यस्त आहे. फिलौरीचं प्रोडक्शन अनुष्का स्वत: करत असून चित्रपटात महत्वाची भूमिकादेखील निभावणार आहे. 
 

Web Title: Vichare did the following bye-bye