'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:51 IST2025-06-02T13:41:27+5:302025-06-02T13:51:29+5:30

टीव्हीवर महादेवाच्या भूमिकेत लोकप्रिय झालेला 'हा' अभिनेता

tv actor mahit raina to play mahadev in ranbir kapoor starrer ramayana movie | 'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार

'रामायण'मध्ये भोलेनाथचं दर्शन होणार, टीव्हीवरील 'हा' अभिनेता पुन्हा महादेवाच्या भूमिकेत दिसणार

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' (Ramayan) सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तगडी स्टारकास्ट, आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शक, VFX अशा अनेक कारणांमुळे हा सिनेमा चर्चेत आहे. सिनेमाची टीम यासाठी खूप मेहनत घेत आहे. 'रामायण' दोन भागांमध्ये बनणार आहे. तसंच अनेक कलाकारांची यामध्ये भूमिका आहे. आता नवीन माहितीनुसार, टीव्हीवर महादेवाच्या भूमिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता मोहित रैना (Mohit Raina) सिनेमात महादेवाचीच भूमिका साकारणार आहे अशी चर्चा आहे.

'रामायण' सिनेमात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारत आहे. अभिनेता यश रावण आहे. रावण हा महादेवाचा मोठा भक्त होता हे तर सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे सिनेमातही महादेवाचं दर्शन घडू शकतं अशी चर्चा आहे. या भूमिकेसाठी 'देवो के देव महादेव' फेम अभिनेता मोहित रैनाला फायनल करण्यात आलं आहे. महादेवाच्या भूमिकेसाठी तो परफेक्ट आहेच. प्रेक्षकही महादेवाच्या रुपात त्यालाच पाहतात इतकं त्याने मालिकेतून यश मिळवलं. अद्याप सिनेमाच्या टीमकडून यावर अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र मोहित रैनाला पुन्हा एकदा महादेवाच्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

'रामायण' सिनेमात यश आणि रणबीर कपूर हे दुसऱ्या भागातच आमने सामने येणार आहेत. त्यामुळे त्यांचं शूटही वेगवेगळं सुरु आहे. सध्या आता दोन तीन महिने यशचं शूट सुरु आहे. त्यातच मोहित रैनाचं शूट नक्की कधी असणार आणि तो खरंच सिनेमात दिसणार  आहे अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर पहिला भाग रिलीज होईल असा अंदाज आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत आहे. टीव्ही अभिनेता रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचं त्याने कन्फर्म केलं आहे. सिनेमात इतरही बरीच स्टारकास्ट आहे. सिनेमाचं बजेट ८३५ कोटी रुपये आहे.

Web Title: tv actor mahit raina to play mahadev in ranbir kapoor starrer ramayana movie