अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा आज स्मृतिदिन

By Admin | Updated: August 6, 2016 10:46 IST2016-08-06T10:46:36+5:302016-08-06T10:46:36+5:30

मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगठा ठसा उमटवणा-या स्मिता तळवळकर यांचा आज (६ ऑगस्ट २०१४) स्मृतिदिन

Today Smriti Day, actress Smita Talwalkar | अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा आज स्मृतिदिन

अभिनेत्री स्मिता तळवलकर यांचा आज स्मृतिदिन

>प्रफुल्ल गायकवाड -
 
मुंबई, दि. 6 -  मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगठा ठसा उमटवणा-या स्मिता तळवळकर यांचा आज (६ ऑगस्ट २०१४) स्मृतिदिन
 
स्मिता तळवलकर या मराठी चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शक होत्या. 
आपल्या कारकीर्दीला प्रथम दूरदर्शनवर वृत्तनिवेदका म्हणून स्मिता तळवलकर यांनी सुरूवात केली. त्यानंतर १९८६ मध्ये ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘गडबड घोटाळा‘ असे दोन चित्रपट केले. त्यांनी ‘अस्मिता चित्र‘च्या बॅनरखाली सहा चित्रपट आणि २५ दूरदर्शन मालिकांची निर्मिती केली. मराठी चित्रपटांतील त्यांचा कसदार अभिनय रसिकांना चांगलाच भावला. मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला होता.
८०च्या दशकात त्यांच्या ‘कळत नकळत‘ या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या ‘तू तिथे मी‘ (१९९८) या चित्रपटाला देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. त्यांचे प्रमुख्याने ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘सवत माझी लाडकी’, ‘तू तिथे मी’, ‘सातच्या आत घरात’ हे चित्रपट आणि ‘अवंतिका’, ‘ऊन पाऊस’ या मालिका विशेष गाजल्या.
स्मिता तळवलकर यांनी अस्मिता चित्र ॲकॅडमीची स्थापना केली होती. या ॲकॅडमीत मुलांना वयाच्या पाचव्या वर्षापासून नाट्य-चित्रपटाचे प्रशिक्षण घेता येते.
 
स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले चित्रपट -
अडगुलं मडगुलं
एक होती वाडी
गडबड घोटाळा
चेकमेट
चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट) 
जन्म
टोपी घाला रे
तू सौभाग्यवती हो
धाकटी सून
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
या गोल गोल डब्यातला
शिवरायांची सून ताराराणी (भूमिका - येसूबाई)
श्यामचे वडील
 
स्मिता तळवलकर यांची भूमिका असलेले नाटक -
गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या (भूमिकेचे नाव - जनाबाई)
 
स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेले चित्रपट -
आनंदाचे झाड
कळत नकळत (१९८९) (राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट)
चौकट राजा (राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट)
तू तिथे मी (१९९८) (राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट)
सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता चित्रपट)
सातच्या आत घरात
 
स्मिता तळवलकर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट -
सवत माझी लाडकी (महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेता चित्रपट)
 
स्मिता तळवलकर यांची निर्मिती असलेल्या दूरचित्रवाणी मालिका -
अर्धांगिनी
अवंतिका
उंच माझा झोका
ऊनपाऊस
कथा एक आनंदीची
घरकुल
पेशवाई
सुवासिनी (स्टार प्रवाह पुरस्कारप्राप्त)
 
मिळालेले पुरस्कार -
राष्ट्रीय पुरस्कार – कळत नकळत
राष्ट्रीय पुरस्कार – तू तिथे मी
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार – सवत माझी लाडकी (१९९२) – दुसऱ्या क्रमांकाचा उत्कृष्ट चित्रपट 
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा ग.दि.मा. पुरस्कार – तू तिथे मी
महाराष्ट्र शासनाचा व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार (२०१०)
मटा सन्मान- उत्कृष्ट मालिका - सुवासिनी (२०१२)
स्टार प्रवाह पुरस्कार - सुवासिनी
 
सौजन्य : मराठी विकिपीडिया 
 

Web Title: Today Smriti Day, actress Smita Talwalkar