तान्या मित्तल आणि मालती चहर यांनी घातलेलं 'ते' स्वेटशर्ट अमालचं नाहीच, झीशान कादरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:29 IST2025-10-31T16:25:40+5:302025-10-31T16:29:00+5:30
तान्या मित्तल आणि मालती चहर यांनी घातलेलं 'ते' स्वेटशर्ट कुणाचं? जाणून घ्या...

तान्या मित्तल आणि मालती चहर यांनी घातलेलं 'ते' स्वेटशर्ट अमालचं नाहीच, झीशान कादरी म्हणाले...
'बिग बॉस १९' सतत चर्चेत आहे. शो सुरू होऊन आता दोन महिने झाले आहेत. हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. बिग बॉसच्या घरात दररोज नवा वाद पाहायला मिळतो. कधी कोणामध्ये भांडण होईल याचा अंदाज बांधणं चाहत्यांनाही शक्य होत नाही. 'बिग बॉस १९'च्या लेटेस्ट भागामध्ये तान्या मित्तल आणि वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती चहर यांच्यात एका स्वेटशर्टवरुन तणाव वाढल्याचं पाहायला मिळाला. दोघींनी ते स्वेटशर्ट अमाल मलिकचं असल्याचं समजून घातलं. पण, ते स्वेटशर्ट अमालचं नाहीच. तर ते बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले स्पर्धक झीशान कादरी यांचं आहे.
अलिकडच्या एपिसोडमध्ये मालतीच्या बॉक्समधून काढून स्वेटशर्ट तान्यानं घातलं. यावेळी तिनं म्हटलं, "हिला काहीही झालं तरी स्वेटशर्ट घालून द्यायचं नाही". दुसरीकडे तान्याने स्वेटशर्ट घातलेलं पाहून मालतीचा चेहरा पाहण्यासारखा झाला आहे. तान्या घरात अमालचं स्वेटशर्ट घालून फिरत असल्याचं पाहून घरातील सदस्यही आश्चर्यचकित झाल्याचं दिसलं. सर्वांचा असा समज आहे की ते स्वेशर्ट अमाल मलिकचा आहे. पण, यावर झीशान कादरी यांनी एक व्हिडीओ शेअर करत ते स्वेटशर्ट आपलं असल्याचं सांगितलं.
व्हिडीओमध्ये ते म्हणाले, "दोन्ही मुली स्वेशर्ट घालत आहेत, त्यांना वाटते की तो अमालचा आहे, पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की तो माझा आहे. मुलींनो, तो माझा आहे, कृपया तो परत करा. दिल्लीत खूप थंडी पडत आहे. मला तिथे जावे लागेल. कृपया तो परत करा".
Aare woh mera sweater hai @itanyamittal@ChaharMalti 🤣 Wapas kardo please😝#ZeishanQuadri#BiggBoss19#TanyaMittal#AmaalMallik#MaltiChahar@JioHotstar@BiggBosspic.twitter.com/qqTVGfqDrq
— Zeishan Quadri (@TheOGZeishan) October 31, 2025
'बिग बॉस १९' मधून कोण झाले बाहेर?
झीशान काद्रीला यापूर्वीच शोमधून बाहेर काढण्यात आले आहे. अलीकडेच नेहल चुडासमा आणि बसीर अली यांना देखील घराबाहेर काढण्यात आले आहे. आता या आठवड्यात घरातून कोण बाहेर काढले जाईल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
