'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी प्रेमात? १३ वर्ष मोठ्या कुशल टंडनला करतेय डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 15:36 IST2024-03-30T15:34:08+5:302024-03-30T15:36:39+5:30
कुशलसाठी शिवांगीने लिहिली पोस्ट

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी प्रेमात? १३ वर्ष मोठ्या कुशल टंडनला करतेय डेट
'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री शिवांगी जोशी (Shivangi Joshi) सध्या चर्चेत आहे. १३ वर्ष मोठ्या अभिनेत्याला ती डेट करत असल्याचं बोललं जात आहे. तो अभिनेता म्हणजे कुशल टंडन (Kushal Tandon). कुशालने कालच आपला 39 वाढदिवस साजरा केला. यानिमित्त शिवांगीने लांबलचक पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या. तसंच तिने अनेक फोटो, व्हिडिओही शेअर केले. यामधून त्यांच्यात काहीतरी शिजत असल्याचंच नेटकऱ्यांना जाणवलं.
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांनी 'बरसाते मौसम प्यार का' मालिकेत एकत्र काम केले होते. सहा महिन्यातच मालिका बंद पडली. मात्र हे कोस्टार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चर्चा जोर धरुन आहे. शिवानीने काल कुशलच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली. तिने मालिकेच्या सेटवरील अनेक आठवणी शेअर केल्या. ती लिहिते,"सर्वात सुंदर व्यक्तीला खूप प्रेम, हास्य आणि खूप आनंद.आज आम्ही तुझ्यासाठी सेलिब्रेट करत आहोत. आणखी एक वर्ष मोठा, समजूतदार आणि आधीपेक्षा आणखी शानदार. खास व्यक्तीसाठी जो प्रत्येक क्षणी खासच आहे, तुझा वाढदिवसही तसाच असाधारण होवो. तुझ्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होवो. यापेक्षा अधिक गोष्टींसाठी तू पात्र आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा."
शिवांगीच्या या पोस्टवर कुशलने हार्ट इमोजी शेअर केलेत. तर नेटकऱ्यांनी कमेंट करत थेट 'लग्न कधी करताय' असा प्रश्न विचारला. अनेकांना ही जोडी आवडली आहे. तर काहींनी मात्र शिवांगी आणि मोहसीन खानचीच जोडी चांगली होती असं म्हटलं आहे. कुशल टंडन याआधी गौहर खानसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आला होता. बिग बॉसमधून त्यांच्यात सीरिअस रिलेशन सुरु झालं. मात्र नंतर त्यांचं नातं तुटलं. सध्या टेलिव्हिजनविश्वात या लव्हअफेअरची खूप चर्चा आहे.