'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून या अभिनेत्याने घेतला निरोप, म्हणाला - 'अलविदा ना पब्लिक...!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 19:41 IST2023-01-25T19:40:33+5:302023-01-25T19:41:02+5:30

Sundara Manamadhye Bharli : सुंदरा मनामध्ये भरली या मालिका रंजक वळणावर आली आहे.

The actor bid farewell to the serial 'Sundara Manaan Bharli', saying - 'Alvida na public...!' | 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून या अभिनेत्याने घेतला निरोप, म्हणाला - 'अलविदा ना पब्लिक...!'

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून या अभिनेत्याने घेतला निरोप, म्हणाला - 'अलविदा ना पब्लिक...!'

कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli) या मालिका रंजक वळणावर आली आहे. इतके दिवस लतिकाला त्रास देणारा दौलत अखेर जेलमध्ये गेला आहे. त्यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. दौलत आणि त्याच्या पत्नीला चांगलीच अद्दल घडली असल्याने प्रेक्षकांनी लतिकाच्या मार्गातील अडथळा दूर झाल्याचे म्हटले आहे. या ट्विस्ट नंतर दौलतचे पात्र मालिकेतून कायमची एक्झिट घेत आहे. दौलतच्या निगेटिव्ह भूमिकेतून अभिनेता ऋषिकेश शेलार (Hrishikesh Shelar) खूप लोकप्रिय झाला. मात्र आता या पात्राची निरोप घेण्याची वेळ आल्यामुळे ऋषिकेशने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.

ऋषिकेश शेलारने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, अलविदा ना पब्लिक! आज सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील माझा 'दौलत' या पात्राचा प्रवास संपतोय. गेलं अडीच वर्ष हे पात्र साकारताना मजा आली. तुम्हा रसिक प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. 

त्याने या पोस्टमध्ये म्हटले की, दौलत हे पात्र रंगवण्यात आमच्या लेखिका, आमचे दिग्दर्शक, माझे सहकलाकार आणि आमची टेक्निकल टीम ह्या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे.स्ट्रॉबेरी पिक्चर्स ऑफिशियलचे धन्यवाद ज्यांनी ह्या मालिकेची निर्मिती केली. कलर्स मराठीचे विशेष आभार.  कारण एखादी भूमिका आपण बरी करू शकू असा विश्वास ( किंवा अतिविश्वास) नट म्हणून आपल्याला स्वतःविषयी अनेकदा वाटतच असतो; पण आपल्यावर विश्वास ठेवून योग्य वेळी एक संधी देणं खूप महत्त्वाचं असतं आणि माझ्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावर ही संधी कलर्स मराठीनी मला दिली. पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. लव्ह यू पब्लिक. (कारण जेवढं प्रेम तुम्ही दौलतला दिलंत तेवढं प्रेम त्याच्या आयुष्यात आलेल्या एकाही मुलीनं किंवा त्याच्या स्वतःच्या आईनं सुद्धा त्याला कधी दिलं नाही)
 

Web Title: The actor bid farewell to the serial 'Sundara Manaan Bharli', saying - 'Alvida na public...!'