प्राची पिसाट प्रकरण मिटवण्यासाठी सायबर क्राइमने केला फोन, पण सुदेश म्हशिलकर यांनी केलं असं काही की...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 10:26 IST2025-05-29T10:25:31+5:302025-05-29T10:26:06+5:30
प्राची पिसाटने सुदेश म्हशिलकर यांची पोलखोल केली असून प्रकरण मिटवण्यासाठी त्यांना फोन केल्यावर काय घडलं, हेही सांगितलं

प्राची पिसाट प्रकरण मिटवण्यासाठी सायबर क्राइमने केला फोन, पण सुदेश म्हशिलकर यांनी केलं असं काही की...
मराठी अभिनेत्री प्राची पिसाट (prachi pisat) अभिनेते सुदेश म्हशिलकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आवाज उठवताना दिसतेय. विविध पोस्ट शेअर करत प्राची याविषयी तिच्या चाहत्यांना अपडेट्स शेअर करताना दिसतेय. अशातच प्राचीने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करुन "५ दिवस झाले तरी त्यांच्याकडून कोणतीही माफी नाही", अशी लांबलचक पोस्ट लिहिली आहे. याशिवाय सुदेश म्हशिलकर (sudesh mhashilkar) यांचा फोन स्वीच ऑफ येतोय, असंही चाहत्यांना सांगितलं आहे.
प्राची पिसाटने दिली महत्वाची अपडेट्स
प्राचीने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "मला वाटतं जबाबदारी महत्वाची आहे! मोठ्या आवाजापेक्षा शांतताही खूप काही बोलून जाते. ५ दिवस झाले तरी कोणतीही माफी नाही. कोणतंही प्रकरण स्पष्ट शब्दांमध्ये आणि प्रगल्भतेने सोडवण्यामध्ये माझा भर असतो. सायबर क्राइममधील आदरणीय अधिकाऱ्यांनी तपास करण्यासाठी त्यांना फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. पुढे फोन स्वीच ऑफ करुन ते या प्रकरणाविषयी काहीच बोलले नाहीत."
"त्यानंतर त्यांच्या नोंदणीकृत पर्यायी क्रमांकावर दुसऱ्या दिवशी (दोन्ही पक्षांनी मान्य केल्याप्रमाणे) फोन करण्यात आला. या प्रकरणाविषयी उघडपणे बोलण्यासाठी किंवा त्यांच्या बाजूने हे प्रकरण मिटवण्यासाठी हा फोन करण्यात आला. त्यांनी अद्याप कॉलला प्रतिसाद दिला नाही किंवा सायबर क्राइम ब्राँचला भेट दिली नाही. या परिस्थितीत तपास करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आमच्या सायबर क्राइम अधिकाऱ्यांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार." प्राचीने आणखी एक पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, "मला एक प्रश्न पडलाय, शूटिंगचे कॉल टाइम कसे मिळतात यांना."
प्रकरण नेमकं काय?
२५ मे रोजी प्राचीने सोशल मीडियावर सुदेश यांचे मेसेज शेअर केले होते. यात सुदेश म्हशिलकर यांनी अभिनेत्रीला "तुझा नंबर पाठव...तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये...कसली गोड दिसतेस", असा मेसेज केला होता. तर दुसऱ्या मेसेजमध्ये "खूपच सेक्सी दिसायला लागलीस हल्ली...वाह", असं सुदेश यांनी म्हटलं होतं. प्राचीने याविरोधात आवाज उठवत सुदेश म्हशिलकर यांच्यावर टीका केली.