‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारी बायको सुद्धा आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:58 PM2022-06-15T14:58:05+5:302022-06-15T15:01:48+5:30

Nave Lakshya : नवे लक्ष्य या मालिकेतील डॅशिंग इन्स्पेक्टरचा पार पडला साखरपुडा; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

star pravah serial nave lakshya fame abhijeet shwetchandra engaged to sejal warde | ‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारी बायको सुद्धा आहे अभिनेत्री

‘नवे लक्ष्य’ मालिकेतील अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, होणारी बायको सुद्धा आहे अभिनेत्री

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) या वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’  ( Nave Lakshya ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. या मालिकेत अनेक कलाकार आहेत.  सोहम बांदेकर, अभिजित श्वेतचंद्र उदय सबनीस, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते अशा कलाकारांचा दमदार अभिनय पाहून प्रेक्षक खूश्श आहेत. याच मालिकेतील डॅशिंग इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडला तुम्ही ओळखत असालच.  आम्ही बोलतोय ते या मालिकेत इन्स्पेक्टर विक्रांत गायकवाडची भूमिका साकारणारा अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र (Abhijeet Shwtchandra ) याच्याबद्दल. अभिजीतने नुकतीच एक गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, नुकताच अभिजीतचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. ( Abhijeet Shwtchandra and Sejal Varde Engaged) 

गेल्या 11 जूनला अभिजीतने  सेजल वर्दे हिच्यासोबत साखरपुडा केला. त्याचे काही फोटो त्याने शेअर केले आहेत. अभिजीतची होणारी नवराई सेजल ही सुद्धा अभिनेत्री आहे.  2017 साली सेजलने ‘रायगड क्वीन’ ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आहे. त्याच वर्षी तिने ‘मिस लोणावळा’ हा खिताबही पटकावला होता.  2018 साली  मिस बेस्ट स्माईल फॅशनिस्ट  आणि  मिस अलिबाग या दोन्ही खिताबांवर तिने आपलं नाव कोरलं होतं.   सेजल मॉडेलही आहे.  साड्यांच्या ब्रॅण्डसाठी तिने मोडेलिंग केलं आहे.  आई तू एकविरा या म्युजिक व्हिडिओमध्ये ती मध्यवर्ती भूमिकेत झळकली होती.  


  
अभिजितबद्दल सांगायचं तर तो मूळचा अलिबाग रायगड जिल्ह्यातला आहे. मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिजीतने खाजगी कंपनीत नोकरी केली होती. मात्र या नोकरीत मनं रमेना म्हटल्यावर त्यानं अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. अनेक संघर्षानंतर  त्याने नाट्य सृष्टीत स्वत:ची ओळख निर्माण केली.

‘मोहें पिया’ हे त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक चांगलंच गाजलं होतं. या नाटकात त्याने घटोत्कचची भूमिका निभावली. यानंतर त्याला मराठी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला. ‘तालीम’ हा त्याचा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटानंतर अभिजीत अनेक मालिकांमध्ये दिसला. 

बापमाणूस, बाजी, गणपती बाप्पा मोरया, साजणा या मालिकांमध्ये त्याने भूमिका साकारल्या.  चाफेकर ब्रदर्स, रेड सारख्या हिंदी चित्रपटातही त्याने भूमिका केल्या.

Web Title: star pravah serial nave lakshya fame abhijeet shwetchandra engaged to sejal warde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.