सृष्टी जैन मेरी दुर्गा मालिकेसाठी बनली भाजीवाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 13:12 IST2017-07-11T07:42:01+5:302017-07-11T13:12:01+5:30

मेरी दुर्गा ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेचे कथानक आता सहा ते सात वर्षं पुढे जाणार आहे. ...

Srishti Jain Mera Durga is made for the series, Bhajiwali | सृष्टी जैन मेरी दुर्गा मालिकेसाठी बनली भाजीवाली

सृष्टी जैन मेरी दुर्गा मालिकेसाठी बनली भाजीवाली

री दुर्गा ही मालिका लवकरच लीप घेणार असून या मालिकेचे कथानक आता सहा ते सात वर्षं पुढे जाणार आहे. या मालिकेत सध्या अनन्या अग्रवाल दुर्गा ही मुख्य भूमिका साकारत आहे. अनन्या या बालकलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. अनन्याची लोकप्रियता पाहाता तिच्याच ताकदीची अभिनेत्री या भूमिकेसाठी आणणे हे मालिकेच्या टीमसाठी आव्हानात्मक होते. मालिकेच्या टीमने अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन घेऊन त्यातून सृष्टी जैनची दुर्गा या प्रमुख भूमिकेसाठी निवड केली आहे. सृष्टीने या आधी सुहानी सी एक लडकी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. 
मेरी दुर्गा या मालिकेने लीप घेतल्यानंतर दुर्गा भाजी विकत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही भूमिका खरी वाटावी यासाठी सृष्टी गेल्या काही दिवसांपासून भाजीविक्रेत्यांचे निरीक्षण करत आहे. एवढेच नव्हे तर या भूमिकेसाठी ती काही भाजीविक्रेत्यांना भेटली आहे आणि त्यांच्यासोबत तिने काही वेळ घालवला आहे. याविषयी सृष्टी सांगते, आपली व्यक्तिरेखा ही अगदी खरीखुरी वाटावी असे प्रत्येकच कलाकाराला वाटत असते. मलाही माझी भाजी विक्रेत्याची भूमिका अस्सल वाटावी असे वाटत होते. त्यासाठी मी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत आहे. भाजी विक्रेत्यांचे दैनंदिन जीवन कशाप्रकारे असते, त्यांची देहबोली कशी असते हे जाणून घेण्यासाठी मी त्यांच्यासोबत काही काळ घालवला. त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांशी ते कसे वागतात हे मी पाहिले. या सगळ्या गोष्टीमुळे मला माझी भूमिका साकारायला मदत झाली आहे. एकाच वेळी ते विविध कामे कशी हाताळतात हे पाहून मी थक्कच झाले होते. मी माझ्या या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेन याची मला खात्री आहे.
सृष्टीने मेरी दुर्गा या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. चित्रीकरणाचा तिचा अनुभव खूपच चांगला असल्याचे ती सांगते. 

Also Read : ​‘मेरी दुर्गा’च्या सेटवर लहानगी अनन्या बनली शेफ!

Web Title: Srishti Jain Mera Durga is made for the series, Bhajiwali