24चे चित्रीकरण संपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2016 17:34 IST2016-09-30T12:04:57+5:302016-09-30T17:34:57+5:30

24 या कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या सिझनच्या लोकप्रियतेनंतर कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. 24च्या पहिल्या ...

Shooting of 24 ended | 24चे चित्रीकरण संपले

24चे चित्रीकरण संपले

24
ा कार्यक्रमाचा पहिला सिझन चांगलाच गाजला होता. या सिझनच्या लोकप्रियतेनंतर कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. 24च्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले होते. पण दुसऱ्या सिझनची लोकांमध्ये खूपच कमी चर्चा ऐकू येत आहे. दुसऱ्या सिझनमध्ये अनिलसोबत साक्षी तन्वर, सुरवीन चावला, आशिष विद्यार्थी, हर्ष छाया, नील भूपलम, सिकंदर खेर, सुधांशू पांडे यांसारखे अनेक कलाकार झळकत आहेत. पहिल्या सिझनमध्ये मंदिरा बेदीने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. पण दुसऱ्या सिझनचा ती भाग झाली नाही. या दुसऱ्या सिझनचे चित्रीकरण नुकतेच संपले. चित्रीकरण संपल्यानंतर अनिल भावुक झाला होता. तो सांगतो, "या मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला खूप गोष्टी शिकता आल्या. हा प्रवास खूपच चांगला होता. हा प्रवास संपल्याचे मला प्रचंड दुःख होत आहे."

Web Title: Shooting of 24 ended