Shocking : अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना झाला डेंग्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2017 13:23 IST2017-10-06T15:34:09+5:302017-10-07T13:23:37+5:30

‘ये हैं मोहब्बते’ या प्रसिद्ध मालिकेतील सर्वच पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत सध्या प्रचंड ड्रामा बघावयास ...

Shocking: actress Neena Kulkarni gets dengue !! | Shocking : अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना झाला डेंग्यू!!

Shocking : अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना झाला डेंग्यू!!

े हैं मोहब्बते’ या प्रसिद्ध मालिकेतील सर्वच पात्रं प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत सध्या प्रचंड ड्रामा बघावयास मिळत आहे. मात्र या मालिकेशी संबंधित एक बातमी समोर येत असून, वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. होय, मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाºया अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना डेंग्यूची लागण झाली आहे. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार नीना यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी कामावर जाणे बंद केले आहे. 

सूत्राने या पोर्टलला सांगितले की, नीना यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्या सध्या टीमसोबत शूटिंग करीत नसून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आराम करीत आहेत. नीना ‘ये हैं मोहब्बते’ या मालिकेत दिव्यांका त्रिपाठीच्या आईची भूमिका साकारत आहेत. मालिकेत नीना यांचे नाव माधवी विश्वनाथन असे आहे. दरम्यान, नीना यांच्या अगोदर हास्य कलाकार सुनील ग्रोवर, ‘इश्कबाज’ची अभिनेत्री श्रेनु पारीख, हीना परमार यांनाही डेंग्यूची लागण झाली होती. 



‘ये हैं मोहब्बते’विषयी सांगायचे झाल्यास, सध्या भल्ला परिवारात घमासान बघावयास मिळत आहे. रमन भल्ला आणि शगुन या दोघांमधील एक सत्य रुहीला समजले आहे. त्यामुळे याच विषयावरून रुही काहीतरी हंगामा करण्याची शक्यता आहे. वास्तविक शगुन आणि रमन एका मुलीला पैसे देऊन निखिलला बदनाम करण्याचे प्लॅनिंग करतात. यानंतर रुहीच्या मनात निखिलप्रती द्वेष निर्माण होतो. आता हे बघणे मजेशीर ठरणार की, रुही यावर तिची भूमिका कशी मांडणार?

Web Title: Shocking: actress Neena Kulkarni gets dengue !!