राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला ठेवले आहे हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 11:11 IST2018-03-02T05:41:57+5:302018-03-02T11:11:57+5:30

सुपर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. ...

Shilpa Shetty has been named by Raj Kundra | राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला ठेवले आहे हे नाव

राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला ठेवले आहे हे नाव

पर डान्सर या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. या कार्यक्रमांच्या यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या सिझनमधील चिमुकले स्पर्धक एकाहून एक सरस परफॉर्मन्स सादर करत आहेत. त्यामुळे कोणता स्पर्धक या कार्यक्रमात बाजी मारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसोबत गीता कपूर आणि अनुराग बासू परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. या कार्यक्रमाच्या आगामी भागात राणी मुखर्जी हिचकी या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. यासोबतच सीआयडी या मालिकेच्या टीममधील शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि आदित्य श्रीवास्तव हे देखील या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. त्या तिघांचा एक वेगळा अंदाज दिसणार आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ते नृत्य करणार आहेत. 
सुपर डान्सर या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीने नुकतेच एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले आहे. तिचे पती राज कुंद्रा तिला कोणत्या टोपण नावाने हाक मारतात याचे गुपित तिने उलगडले. शिल्पा शेट्टी ही तितकीशी टेक्नोसॅव्ही नाहीये आणि त्यावरूनच तिच्या पतीने तिचे एक नाव ठेवले आहे. याविषयी शिल्पा शेट्टी सांगते,  
मी माझ्या फॅन्सोबत संपर्कात राहाण्यासाठी माझ्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरून माझे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच पोस्ट करत असते. पण मी सुरुवातीला तितकीशी टेक्नोसॅक्टी नव्हते. त्यामुळे मला कोणाची तरी मदत घ्यावी लागत असे. त्यामुळे माझे पती राज कुंद्रा यांनी मला 'बीबीसी' हे नाव दिले आहे. त्यांच्यामते संगणक यायच्या पूर्वी ज्यांचा जन्म झाला, त्यांना टेक्नॉलॉजीमधील गोष्टी कळत नाहीत आणि मी देखील त्यातील एक आहे. पण आता मी  सोशल मीडियाचा वापर खूपच चांगल्या प्रकारे करते. 
सुपर डान्सर या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते याबद्दल सांगत देखील आहेत. त्यातही आकाश थापाचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना प्रचंड आवडत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.   

Web Title: Shilpa Shetty has been named by Raj Kundra