​चाहूल या मालिकेत शांभवीला होणार सर्जाच्या प्रेमाची जाणीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2017 16:35 IST2017-07-17T11:05:35+5:302017-07-17T16:35:35+5:30

मालिकांमध्ये शीर्षक गीताशिवाय इतर गीतेदेखील असल्याचे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते. चाहूल या मालिकेत देखील प्रेक्षकांना आता एक प्रेमगीत ...

Shannon will love Shanbhavi's love for this series | ​चाहूल या मालिकेत शांभवीला होणार सर्जाच्या प्रेमाची जाणीव

​चाहूल या मालिकेत शांभवीला होणार सर्जाच्या प्रेमाची जाणीव

लिकांमध्ये शीर्षक गीताशिवाय इतर गीतेदेखील असल्याचे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळते. चाहूल या मालिकेत देखील प्रेक्षकांना आता एक प्रेमगीत ऐकायला मिळणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच करण्यात आले. 
चाहूल मालिकेमध्ये भोसलेंनी त्यांचा वाडा सोडल्यानंतर त्यांच्या घरातील सगळीच मंडळी आता निश्चिंत झाली आहेत. वाड्यामध्ये असलेल्या भूतापासून आता कुठलाही त्रास होणार नाही, आता आपल्याला कुठलीच भीती राहिलेली नाही, या घरामध्ये आता आपण निवांत राहू शकतो असे त्यांना वाटत आहे. पण वाडा सोडल्यावर भोसल्यांना खरोखरच शांतता लाभणार का हा प्रश्न पडला आहे. कारण या मालिकेला आता एक नवे वळण मिळणार आहे.
भोसले परिवाराला शांभवी सोडून गेली असल्याचे मालिकेत नुकतेच दाखवण्यात आले होते. सर्जापासून दूर गेल्यावर प्रत्येक क्षणी शांभवीला सर्जाची आठवण येत आहे.. हे गाणे अनेक रोमँटिक ठिकाणी जाऊन चित्रीत करण्यात आले. हे गाणे प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.
तर दुसरीकडे वाडा सगळ्यांनी सोडल्यानंतरही त्या वाड्यातच राहायची सर्जाची इच्छा होती. पण आता तो आपल्या कुटुंबीयांसाठी नव्या वाड्यात राहायला आला आहे. पण या वाड्यामध्ये देखील काहीना काही तरी अघटीत घडतेच आहे. त्यामध्ये भर म्हणून आता जुन्या भोसले वाड्यामधून निर्मलाने स्वत:ची मुक्तता केली आहे. ती वाड्यामधून बाहेर पडली आहे आणि आता ती एका बाहुलीच्या मदतीने नव्या भोसले वाड्यात आली आहे. ती आता नव्या वाड्यामध्ये येऊन चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. 

Also Read : चाहूल फेम शाश्वती पिंपळीकरचा टॅटू तुम्ही पाहिला का?

Web Title: Shannon will love Shanbhavi's love for this series