Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची एन्ट्री होताच नॉर्वेमधील प्रेक्षकांनी उभं राहून केला टाळ्यांचा कडकडाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 16:04 IST2025-11-05T15:59:38+5:302025-11-05T16:04:38+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा युरोपमध्ये कार्यक्रम झाला. त्यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी काही मिनिटं समीर चौघुलेेंना उभं राहून मानवंदना दिली

Video: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची एन्ट्री होताच नॉर्वेमधील प्रेक्षकांनी उभं राहून केला टाळ्यांचा कडकडाट
समीर चौघुले हे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. समीर यांना आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये काम केलंय. समीर सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये काम करत आहेत. समीर सध्या जगभरात त्यांचा एकपात्री कार्यक्रम 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' याचे प्रयोग करताना दिसतात. समीर यांच्या या प्रयोगांना त्यांना प्रेक्षकांकडून चांगली दाद मिळते. अशातच युरोपमधील नॉर्वे येथे झालेल्या एका प्रयोगात समीर यांची एन्ट्री होतात चाहत्यांनी उभं राहून त्यांना मानवंदना दिली.
समीर यांना चाहत्यांकडून स्टँडिंग ओव्हेशन
समीर चौघुलेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत 'सम्या सम्या मैफिलीत माझ्या' हा कार्यक्रम सुरु होण्याआधी नॉर्वेतील प्रेक्षकांनी अभिनेत्याला उभं राहून मानवंदना दिली. याशिवाय त्यांच्या डायलॉगचे खास पोस्टर सोबत आणले होते. प्रेक्षकांचं प्रेम पाहून समीर भारावून गेले. त्यांनी भावुक शब्दात हा अनुभव लिहिला आहे.
व्हिडीओ शेअर करुन समीर लिहितात, ''प्रत्येक कलाकार का जगत असतो? या अश्या काही क्षणांसाठी…माझ्या “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” या कार्यक्रमाच्या Stavangar नॉर्वे 🇳🇴 च्या प्रयोगाला प्रेक्षकांनी एंट्रीला दिलेल हे Standing Ovation आणि त्यांचा प्रतिसाद, प्रेम थक्क करणार होत …एखादी क्रिकेट मॅच बघायला जाताना नेतात तसे ‘उंदीर मांजर पकडिंगो’चे पोस्टर्स प्रेक्षकांनी प्रेक्षागृहात आणले होते.''
''कार्यक्रम सुरू असताना त्यांना खळखळून हसताना बघितलं की जीवन सार्थक झाल्याचा फील येतो…अश्या अनुभवांपुढे तुम्ही निशब्द होता..फक्त एकच गोष्ट करू शकता “नतमस्तक होणे”..जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा…आणि रसिक मायबाप तुम्हाला दंडवत …'', अशा शब्दात समीर चौघुलेंनी त्यांचा अनुभव सांगितला आहे