एखादा विनोद पडला तर समीर चौगुले काय करतात? सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली- "तो अशक्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:13 IST2025-10-24T14:11:24+5:302025-10-24T14:13:41+5:30
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता समीर चौगुले यांच्याविषयी सई ताम्हणकरने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. काय म्हणाली अभिनेत्री?

एखादा विनोद पडला तर समीर चौगुले काय करतात? सई ताम्हणकरचा खुलासा, म्हणाली- "तो अशक्य..."
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सई ताम्हणकर गेली काही वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमध्ये दिसतेय. हास्यजत्रेतील कलाकारांच्या विविध स्कीटबद्दल ती तिच्या खास शब्दात प्रतिक्रिया देताना दिसते. 'हास्यजत्रे'शी सई ताम्हणकरचं खास नातं आहे. अशातच सई ताम्हणकरने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता समीर चौगुलेंबद्दल खास खुलासा केलाय.
सई ताम्हणकरने अमुक तुमकला दिलेल्या मुलाखतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अभिनेता समीर चौगुलेंबद्दल खास प्रतिक्रिया दिली. सई म्हणाली की, ''अशक्य आहे तो माणूस. त्या माणसाला आशीर्वाद आहे. एक पंच पडला तर दुसरा मी वाजवणार, ही त्याच्यातली ओढ किंवा हाव आहे, ती संपलेली नाहीये. इतकं वर्ष काम करुनही हा गुण त्याच्यात आहे. म्हणजे, मी कित्येक अभिनेते सेटवर बघितलेत की ते आधी येऊन विचारतात, आज माझं पॅकअप कधी आहे? ते कलाकार माझ्या डोक्यात जातात.''
''आज तुमची डेट आहे, तर इथेच राहा. तुम्हाला घरी का जायचंय? तुम्ही काम करायला आलात तर, हा काय प्रश्न आहे की, आज माझं पॅकअप कधी होणार. माझं डोकंच फिरतं. या गोष्टीच्या विरुद्ध आमचे हास्यजत्रेतील कलाकार आहेत.'', अशा शब्दात सई ताम्हणकरने खुलासा केला आहे. एकूणच हिंदी-मराठी सिनेमा, वेबसीरिजच्या शूटिंगमध्ये सई ताम्हणकर व्यस्त असली तरीही तिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची साथ सोडलेली नाही. क्वचित सई हास्यजत्रेतून ब्रेक घेताना दिसते. पण शूटिंग संपलं की, सई पुन्हा प्रसाद ओकसोबत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये हास्यरसिक म्हणून बसलेली दिसते.