साथ निभाना साथिया फेम विशाल सिंग पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 12:03 IST2017-07-26T06:33:01+5:302017-07-26T12:03:01+5:30

साथ निभाना साथिया ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत विशाल ...

Saathiya Fame Vishal Singh fell in love with the actress | साथ निभाना साथिया फेम विशाल सिंग पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात

साथ निभाना साथिया फेम विशाल सिंग पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात

थ निभाना साथिया ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत विशाल सिंगने जिगर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या भूमिकेमुळे त्याच्या महिला चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. 
विशाल सिंग आता एक मुलीच्या प्रेमात पडला असून त्यानेच ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली आहे. विशाल सध्या एका अभिनेत्रीसोबतच नात्यात आहे. विशाल सिंग जेसिका इस्कांदर या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला असल्याचे त्यानेच सांगितले आहे. जेसिका ही एक इंडोनेशियाची अभिनेत्री आहे. विशाल सिंग सध्या भारतीय मालिकांसोबतच इंडोनेशियाच्या मालिकांमध्ये देखील काम करत आहे. पेसबुकर या त्याच्या इंडोनेशियामधील मालिकेच्या सेटवरच त्या दोघांची ओळख झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांची ओळख होऊन आता जवळजवळ अडीज महिने झाले आहेत. जेसिका ही सिंगल मदर असून तिला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. याविषयी स्पॉटबॉय या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हटले आहे की, माझ्या आयुष्यात एक पोकळी होती आणि आज ती पोकळी जेसिकाने भरून काढली आहे. तिच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप बदल घडला आहे. ती खूप चांगली असून आज ती माझ्या आयुष्याचा भाग आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजत आहे.  
विशाल गेल्या अनेक महिन्यांपासून इंडोनेशियामध्येच राहात आहे. विशाल आणि जेसिका हे दोघेही मालिकेत काम करत असून त्यांचे चित्रीकरण सध्या सुरू आहे.   

vishal singh girlfriend

 

Web Title: Saathiya Fame Vishal Singh fell in love with the actress