​कुल्फीकुमार बाजावालामध्ये इक्बाल खान दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2018 11:01 IST2018-02-21T05:31:46+5:302018-02-21T11:01:46+5:30

इक्बाल खानने आजवर कही तो होगा, काव्यांजली, वारिस, एक था राजा एक थी राणी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या ...

In the role of Iqbal Khan appearing in Kulfikumar Bajwa | ​कुल्फीकुमार बाजावालामध्ये इक्बाल खान दिसणार या भूमिकेत

​कुल्फीकुमार बाजावालामध्ये इक्बाल खान दिसणार या भूमिकेत

्बाल खानने आजवर कही तो होगा, काव्यांजली, वारिस, एक था राजा एक थी राणी यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शो मध्ये देखील तो झळकला होता. इक्बालने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला फंटूश, बुलेट-एक धमाका यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. त्याला त्याच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इक्बाल गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. त्याने दरम्यानच्या काळात कालभैरव- रहस्य आणि बहू हमारी रजनिकांत या मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. आता तो छोट्या पडद्यावर पुन्हा काम करण्यास सज्ज झाला आहे. कुल्फीकुमार बाजावाला या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे.
कुल्फीकुमार बाजावाला या मालिकेची निर्माती गुल खान आहे. गुल खान आणि इक्बाल हे एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. त्यामुळे गुलने कुल्फीकुमार बाजावाला या मालिकेबाबत विचारले असता त्याने या मालिकेत काम करण्यास लगेचच होकार दिला. ही मालिका लवकरच प्रेक्षकांना ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळणार आहे. या मालिकेत इक्बाल प्रेक्षकांना एका संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा या मालिकेतील भूमिका वेगळी असल्याने या मालिकेत काम करण्यासाठी इक्बालने लगेचच होकार दिला. या मालिकेत काम करण्यास इक्बाल खूपच उत्सुक आहे. 
पूर्वी काही थरारक मालिकांमध्ये साहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसलेला इक्बाल खान आता कुल्फीकुमार बाजावाला या आगामी मालिकेत एका यशस्वी संगीतकाराच्या भूमिकेत दिसणार असून त्याचा संपूर्ण लूकही बदललेला असणार आहे. इक्बालची या मालिकेत जोडी अंजली आनंदबरोबर जमणार आहे. एक तरुण मुलगी आपल्या कुटुंबाला परिपूर्ण करण्यासाठी आपल्या बेपत्ता वडिलांचा शोध घेते, अशी कुल्फीकुमार बाजावाला या मालिकेची संकल्पना आहे.
कुल्फीकुमार बाजावाला या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री अपरा मेहता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत ती एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: In the role of Iqbal Khan appearing in Kulfikumar Bajwa