"चहलचा घटस्फोट झाला तेव्हा मीच त्याच्यासोबत होते, पण...", RJ महावशने सांगितलं क्रिकेटरला अनफॉलो करण्याचं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 09:44 IST2026-05-18T09:44:13+5:302026-05-18T09:44:33+5:30
काही महिन्यांपूर्वीच चहल आणि आरजे महावश यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलोही केलं. त्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता पहिल्यांदाच आरजे महावशने मौन सोडलं आहे.

"चहलचा घटस्फोट झाला तेव्हा मीच त्याच्यासोबत होते, पण...", RJ महावशने सांगितलं क्रिकेटरला अनफॉलो करण्याचं खरं कारण
क्रिकेटर युजवेंद्र चहलचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्यानंतर त्याचं नाव आरजे महावशसोबत जोडलं जात होतं. चहल आणि आरजे महावश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. पण, त्यांच्यात केवळ मैत्रीचं नातं असल्याचं सांगण्यात आलं. काही महिन्यांपूर्वीच चहल आणि आरजे महावश यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलोही केलं. त्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यावर आता पहिल्यांदाच आरजे महावशने मौन सोडलं आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत आरजे महावशने चहलला अनफॉलो करण्याचं खरं कारण सांगितलं. ती म्हणाली, "लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर हंगामा करण्याची सवय आहे. पण ही काही एवढी मोठी गोष्ट नाही. दोन मित्रांमध्ये भांडण झालं आणि त्यांनी एकमेकांना अनफॉलो केलं. हे तसंच आहे. जर तुम्ही तुमच्या मित्रासोबत बिनधास्तपणे बोलू शकता. तर तुम्हाला कोणतीच तक्रार नसली पाहिजे. मी नेहमीच त्याच्यासाठी प्रार्थना करेन".
चहलसोबतच्या नात्यावरही आरजे महावशने भाष्य केलं. "आमचं नातं फक्त मैत्रीचं होतं. त्यापलिकडे काहीच नव्हतं. मी त्याची चांगली मैत्रीण होते. जेव्हा त्याचा घटस्फोट होत होता तेव्हा त्याला एका चांगल्या मैत्रिणीची गरज होती. तेव्हा मी त्याच्यासोबत होते. यापुढेही आम्ही पहिल्यासारखचं एकमेकांसोबत मैत्रीचं नातं ठेवू. मी नेहमीच एक मैत्रीण म्हणून त्याच्यासोबत असेन", असंही आरजे महावशने सांगितलं.