​रेणुका शहाणे खिचडी या मालिकेत दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 15:21 IST2017-12-14T09:51:48+5:302017-12-14T15:21:48+5:30

रेणुका शहाणेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सर्कस, सुरभी, सैलाब यांसारख्या तिच्या कार्यक्रमांची तर ...

Renuka Shahane Khichdi plays this role in the series | ​रेणुका शहाणे खिचडी या मालिकेत दिसणार या भूमिकेत

​रेणुका शहाणे खिचडी या मालिकेत दिसणार या भूमिकेत

णुका शहाणेने तिच्या करिअरच्या सुरुवातीला छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. सर्कस, सुरभी, सैलाब यांसारख्या तिच्या कार्यक्रमांची तर चांगलीच चर्चा झाली होती. रेणुका गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. कोणत्याच हिंदी मालिकेत तिने अनेक वर्षांत काम केलेले नाही. पण आता ती छोट्या पडद्यावर परतत आहे आणि छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना तिचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. ती या मालिकेत प्रेक्षकांना डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने आजवर सगळ्याच सकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. तिच्या हास्यावर तर प्रेक्षक प्रचंड फिदा असतात. पण आता ती एका भयानक डॉनची भूमिका साकारणार आहे. खिचडीच्या सुरुवातीच्याच भागांमध्ये रेणुकाची एंट्री होणार असून ती पारेख कुटुंबातील एखाद्या सदस्याचे अपहरण करते असे मालिकेत दाखवण्यात येणार आहे. 
खिचडी ही मालिका पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या मालिकेत जुन्या कलाकारांसोबतच काही नव्या कलाकारांची एंट्री होणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये खिचडी या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, सुप्रिया पाठक, वंदना पाठक आणि स्वत: जे. डी. मजेडिया प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. खिचडी या मालिकेत आता रेणुकासोबत आणखी काही नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ‘पीओडब्ल्यू’ मालिकेतील समीक्षा देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दिल तो पागल है या मालिकेत झळकलेल्या बलविंदर सिंगची या मालिकेत एंट्री होणार आहे. बलविंदर आणि समीक्षा आपल्याला परमिंदर कुटुंबातील सदस्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे निर्माते आतिश कपाडिया यांचा मुलगा अगस्त्या आणि जेडी मजेठीया यांची मुलगी मिश्री या मालिकेत जॅकी आणि चक्की या भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच सुनील ग्रोव्हर देखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 
खिचडी या मालिकेतील हॅलो हाऊ आर खाना खाके जाना हा... हा सुप्रिया पाठकचा संवाद चांगलाच गाजला होता. तसेच प्रफुल्लचे हंसाला इंग्रजी भाषेचा हिंदीत अर्थ समजावणे हे प्रेक्षकांना चांगलेच रुचले होते. खिचडी ही मालिका संपून अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील हंसा, प्रफुल्ल, जयश्री, बाऊजी, राजू, मेलिसा, चक्की, जॅकी, भावेश कुमार या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. 

Also Read : ​‘खिचडी’ या मालिकेचा भाग असणार अभिनेत्री ट्विंकल खन्ना

Web Title: Renuka Shahane Khichdi plays this role in the series