Bigg Boss 15 : 'वापरुन फेकून द्यायला मी टिश्शू पेपर नाही'; राखी सावंतने केला बिग बॉसवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 10:40 AM2022-01-28T10:40:31+5:302022-01-28T10:40:56+5:30

Rakhi sawant: सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडतांना दिसत आहे.

rakhi sawant crying after eviction before finale saying that bigg boss do not treat me like tissue paper | Bigg Boss 15 : 'वापरुन फेकून द्यायला मी टिश्शू पेपर नाही'; राखी सावंतने केला बिग बॉसवर मोठा आरोप

Bigg Boss 15 : 'वापरुन फेकून द्यायला मी टिश्शू पेपर नाही'; राखी सावंतने केला बिग बॉसवर मोठा आरोप

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणाऱ्या 'बिग बॉस'  (Bigg Boss 15) या शोच्या १५ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राखी सावंतला (rakhi sawant) या शोचा निरोप घ्यावा लागला. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर राखी प्रचंड भावूक झाली असून 'बिग बॉस' कायम मनोरंजन करण्यासाठी माझा वापर करतात असा आरोप तिने केला आहे. 

सध्या सोशल मीडियावर राखीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत रडतांना दिसत आहे. तसंच बिग बॉस कायम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी मला या शोमध्ये बोलवतात. पण, फिनाले जवळ आला की मला अलगद गेममधून बाहेर काढतात असा आरोप तिने केला आहे. 

"बिग बॉस, तुम्ही दरवर्षी मला बोलवत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही टिश्शू पेपरप्रमाणे माझा वापर कराल. मी टिश्शू पेपर नाहीये बिग बॉस. मी एक जिवंत व्यक्ती आहे. तुम्ही माझ्याकडून मनोरंजन करुन घ्याल आणि फिनालेची वेळ आली की मला डावलून दुसऱ्यांना फायनलपर्यंत न्याल", असं राखी म्हणते.

पुढे ती म्हणते, "माझं बिग बॉसवर किती प्रेम आहे हे त्यांनाही माहितीये. पण, मी ट्रॉफीची दावेदार होती. ट्रॉफी मिळवण्यासाठी मी हक्कदार होते. मी कोणतंही संत्री किंवा लिंबू नाही की जोपर्यंत रस निघतोय तोपर्यंत पिळून घ्या आणि रस संपल्यावर सालं फेकून द्या. माझ्यात प्रेक्षकांना एंटरटेन करायची क्षमता होती."

दरम्यान, राखी सावंत बिग बॉस १५ पूर्वी बिग बॉस १४ मध्येही झळकली होती. या पर्वातही ती ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. मात्र, ऐन फिनालेच्या वेळी तिला बाहेर पडावं लागलं. यावेळी राखी १४ लाखांची बक्षीसाची रक्कम घेऊन बाहेर पडली होती. 
 

Web Title: rakhi sawant crying after eviction before finale saying that bigg boss do not treat me like tissue paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.