प्रियांका चोप्राने इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सच्या स्पर्धकांना दिला हा कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 07:08 AM2017-12-28T07:08:10+5:302017-12-28T12:38:10+5:30

जागतिक स्टार प्रियांका चोप्राने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अंदाज या ...

Priyanka Chopra gave the idea to the contestants of India's Next Superstars | प्रियांका चोप्राने इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सच्या स्पर्धकांना दिला हा कानमंत्र

प्रियांका चोप्राने इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सच्या स्पर्धकांना दिला हा कानमंत्र

googlenewsNext
गतिक स्टार प्रियांका चोप्राने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात अक्षय कुमार आणि लारा दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अंदाज या चित्रपटाने केली. अंदाज हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील अक्षय, प्रियांका आणि लारा तिघांच्याही भूमिकेचे कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी प्रियांका आणि लारा या दोघांनाही सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. प्रियांका आज अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत असून तिने केवळ बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे स्थान निर्माण केले आहे. प्रियांकाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक केले जाते. प्रियांका चोप्रा ही एक गुणी अभिनेत्री असल्याचे सगळेच मान्य करतात. प्रियांका ही चांगली अभिनेत्री असल्याचा तिला देखील विश्वास आहे. इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या रिॲलिटी शो मध्ये नुकतीच तिने सेलिब्रिटी परीक्षक म्हणून हजेरी लावली होती. तिनेच या कार्यक्रमात ही गोष्ट सांगितली. प्रियांका सांगते, भले माझा चित्रपट चालला असो किंवा नसो माझ्या कामाचे नेहमीच कौतुक केले गेले आहे. मी एक चांगली अभिनेत्री असल्याचे सगळ्यांनीच मान्य केले आहे. प्रियांका सध्या चित्रीकरणाच्या निमित्ताने परदेशातच असते. ती नुकतीच भारतात आली होती आणि तिने स्टार प्लसवरील आगामी रिॲलिटी शो इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्यासोबत सेलिब्रिटी परीक्षक म्हणून चित्रीकरण केले. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या वेळी तिने या कार्यक्रमाच्या स्पर्धकांसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. ती म्हणाली, “मी काम करताना नेहमीच माझे ११० टक्के देते. कदाचित आजवर माझे सगळेच चित्रपट गाजले नसतील, पण माझ्या कामाची नेहमीच प्रशंसा झाली आहे आणि त्यामुळेच मला कायमच काम मिळत राहिले.” भावी कलाकारांना प्रोत्साहन देताना ती म्हणाली, “मी माझ्या अभिनयावर ज्याप्रमाणे विश्वास ठेवते, त्याप्रमाणे तुम्ही देखील तुमच्या अभिनयावर विश्वास ठेवा. तुमचा तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच यश मिळवू शकता.”
प्रियांका चोप्रा सेलिब्रिटी परीक्षक म्हणून इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सच्या पहिल्या भागातच हजेरी लावणार आहे. 

Also Read : ​प्रियांका चोप्रा नाही, डॉक्टर प्रियांका चोप्रा म्हणा!!

Web Title: Priyanka Chopra gave the idea to the contestants of India's Next Superstars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.