प्रीतीका रावने वर्षभरापूर्वीच साईन केला होता लव्ह का है इंतजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 13:12 IST2017-08-09T07:42:18+5:302017-08-09T13:12:18+5:30

बेइंतहा या मालिकेमुळे प्रीतीका राव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकरलेली झैन अब्दुल्ला ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. ...

Pritika Rao had signed a year ago. Love is waiting | प्रीतीका रावने वर्षभरापूर्वीच साईन केला होता लव्ह का है इंतजार

प्रीतीका रावने वर्षभरापूर्वीच साईन केला होता लव्ह का है इंतजार

इंतहा या मालिकेमुळे प्रीतीका राव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकरलेली झैन अब्दुल्ला ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली होती. आता ती लव्ह का है इंतजार या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर परतत आहे. या मालिकेत तिच्यासोबत मोहित सेहगल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मोहित नुकताच नच बलिये या कार्यक्रमात झळकला होता. 
लव्ह का है इंतजार या मालिकेत प्रेक्षकांना किथ सिक्वेरा आणि संजिदा शेख यांची जोडी पाहायला मिळाली होती. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली देखील होती. पण ही मालिका आता लीप घेणार असून आता या मालिकेत प्रीतीका आणि मोहित प्रमुख भूमिका साकारणार आहेत. यासोबतच या मालिकेत आता अनेक नवे कलाकार पाहायला मिळणार आहेत. 
प्रीतीका राव मालिकांसोबत दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम करते. पण या चित्रपटांमधून वेळ काढून प्रीतीका सध्या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. प्रीतीका चित्रपटात व्यग्र असल्याने मालिकेसाठी कितपत वेळ देऊ शकेल याची काळजी मालिकेच्या निर्मात्यांना होती. त्यामुळे त्यांनी तिच्या तारखा मिळवण्यासाठी तिला या भूमिकेविषयी खूप आधीपासूनच कल्पना दिली होती. याविषयी प्रीतीका सांगते, या मालिकेचा निर्माता सिद्धार्थ मल्होत्रा माझा खूपच चांगला मित्र असून त्याने मला काही महिन्यांपूर्वीच मोहिनी या भूमिकेविषयी सांगितले होते. या मालिकेची पटकथा वाचल्यावर या भूमिकेसाठी मी लगेचच होकार दिला. मला इतकी चांगली भूमिका गमवायची नव्हती. त्यामुळे मी या मालिकेच्या करारारवर मार्च २०१६ मध्येच स्वाक्षरी केली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाला मी आता नुकतीच सुरुवात केली आहे. या दरम्यान एक वर्षांहूनही अधिक कालावधी गेला. पण मी एका चांगल्या मालिकेचा भाग बनत आहे याचा मला आनंद होत आहे. 



Web Title: Pritika Rao had signed a year ago. Love is waiting