​पृथ्वी वल्लभ फेम जितिन गुलाटी पडला प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 19:43 IST2018-03-02T14:13:18+5:302018-03-02T19:43:18+5:30

अभिनेता जितिन गुलाटी सोनी एंटरटेनमेंट वरच्या पृथ्वी वल्लभ या मालिकेत तैलप ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा ...

Prithvi Vallabh fame Jatin fell in love | ​पृथ्वी वल्लभ फेम जितिन गुलाटी पडला प्रेमात

​पृथ्वी वल्लभ फेम जितिन गुलाटी पडला प्रेमात

िनेता जितिन गुलाटी सोनी एंटरटेनमेंट वरच्या पृथ्वी वल्लभ या मालिकेत तैलप ही भूमिका साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत तो मृणालच्या म्हणचेच सोनारिका भोडोरियाच्या भावाची भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याने या मालिकेसाठी खूप सारे माहितीपट पहिले आहेत. तसेच घोडस्वारी देखील शिकली आहे. जितिन गेल्या कित्येक दिवसांपासून घोडस्वारीचे प्रशिक्षण घेत आहे. घोडेस्वारी शिकण्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. पण आता तो एक खूप चांगला घोडेस्वार बनला आहे. या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्याच्यासोबत असणाऱ्या घोड्यासोबत तर त्याची एक चांगलीच बॉन्डिंग निर्माण झाली आहे. याविषयी जितिन गुलाटी सांगतो, “पृथ्वी वल्लभ या भूमिकेतील तैलपच्या भूमिकेसाठी माझी निवड झाल्यानंतर घोडस्वारी आणि तलवारबाजीचे  प्रशिक्षण घेणे हे माझ्यासाठी गरजेचे होते. त्यामुळे  आम्ही फिल्म सिटी जवळ असलेल्या परिसरातच घोडा प्रशिक्षण सत्र सुरू केले होते. पण दरवेळी तिथे वेगवेगळे घोडे असायचे. ज्या घोड्यावर आपण स्वार होतो, त्या घोड्यासोबत आपले चांगले संबंध असणे आवश्यक आहे. त्यामुळे मी एकाच घोड्यासोबत प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. आता मी माझ्या घोड्यासोबत माझे ट्युनिंग खूप चांगले जमले आहे. आमची मैत्री पण झाली आहे. माझ्या घोडीचे नावे पूजा असून तिच्यासोबत शूटिंग करताना मला खूप मजा येते आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ती मला ओळखते. ती मला पाहून खूश होते. तिला आता चित्रीकरणाच्या आधी मी काही बिस्किटे आणि गाजर खायला घालतो. ती माझ्याकडून तिचे लाड देखील करून घेते. मला तिला चार-पाच वेळा तरी धोपटावे लागते. त्यानंतरच ती शॉटसाठी तयार होते. आणखी एक मनोरंजक गोष्ट जी तिच्या प्रशिक्षणाची भाषा चांगल्याप्रकारे समजते, तिला CUT’ आणि ACTION’ हे दोन्ही शब्द कळायला लागले आहेत. ती स्टंट खूप छान करते. मला सेटवर तिच्यासोबत वेळ वेळ घालवायला आवडतो.

Web Title: Prithvi Vallabh fame Jatin fell in love