अपराने घेतली केतकीची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2016 18:15 IST2016-06-20T12:45:52+5:302016-06-20T18:15:52+5:30

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत अपरा मेहता आणि केतकी दवे यांनी एकत्र काम केले होते. आता ...

Place | अपराने घेतली केतकीची जागा

अपराने घेतली केतकीची जागा

योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत अपरा मेहता आणि केतकी दवे यांनी एकत्र काम केले होते. आता एका मालिकेत अपराने केतकीची जागा घेतली आहे. नया महिसागर या मालिकेत प्रेक्षकांना सून आणि सासूमधील मजेशीर भांडणे पाहायला मिळतात. या मालिकेत सासूची भूमिका केतकी दवे साकारत होती. पण आता ही भूमिका अपरा साकारणार आहे. अपराने साकारलेल्या आतापर्यंतच्या सगळ्या व्यक्तिरेखापेक्षा ही व्यक्तिरेखा वेगळी असल्याने ही भूमिका साकारण्यास खूप मजा येत असल्याचे अपरा सांगते. या मालिकेची पटकथा एका गुजराती कुटुंबाभोवती फिरत असल्याने अपरा या मालिकेत गुजराती वेशभूषेत पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Place