​पल्लवी पाटीलची लव्ह लग्न लोचामध्ये एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 16:21 IST2017-01-05T16:21:42+5:302017-01-05T16:21:42+5:30

पल्लवी पाटीलने रुंजी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. रुंजी या ...

Pallavi Patil's Love Entry in Love Lochi | ​पल्लवी पाटीलची लव्ह लग्न लोचामध्ये एंट्री

​पल्लवी पाटीलची लव्ह लग्न लोचामध्ये एंट्री

्लवी पाटीलने रुंजी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. रुंजी या मालिकेनंतर पल्लवीने काही महिन्यांचा ब्रेक घेतला. पल्लवी मालिकांकडे कधी वळणार याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात होते. पण पल्लवी लग्नाच्या गडबडीत असल्याने ती काही महिने छोट्या पडद्यापासून दूर होती. पल्लवी गेल्याच महिन्यात अभिनेता संग्राम समेळसोबत विवाहबंधनात अडकली. आता लग्नानंतर पुन्हा पल्लवी तिच्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजेच अभिनयाकडे वळली आहे.
लव्ह लग्न लोचा या मालिकेत लवकरच तिची एंट्री होणार आहे. तिच्या एंट्रीनंतर मालिकेत एक सुंदर ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत पल्लवी रुचा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. राघववर अतोनात प्रेम करणारी ही रुचा आहे. तिचे राघववर प्रेम आहे, पण तिचे घरातले तिचे लग्न लावून देत असल्याने ती लग्नमंडपातून पळून थेट राघवकडे आली आहे. ती राघवची पूर्वप्रेयसी असून केवळ राघवसोबतच लग्न करायचे असे तिने ठरवले आहे. तर दुसरीकडे रुचा ही कधीकाळी आपली प्रेयसी होती हे राघव आता विसरूनदेखील गेला आहे.
राघवने आपण आता सुधारायचे, कोणत्याची चुकीच्या मार्गावर जायचे नाही असे ठरवले असतानाच रुचाचा त्याच्या आयुष्यात प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता आपण रुचाशीच लग्न करुया असा तो विचार करत आहे. पण त्याच्या घरातले सगळेच लग्न करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. त्यामुळे राघवच्या आयुष्यात आता काय घडतेय हे पाहाणे नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे.  

Web Title: Pallavi Patil's Love Entry in Love Lochi