ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 09:50 IST2023-02-19T09:47:32+5:302023-02-19T09:50:21+5:30

ओंकार भोजने थेट वनिताच्या घरी दाखल झाला. पुढे काय झालं एकदा बघाच

onkar bhojne and vanita kharat hug each other as he visits actress at her home | ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल

ओंकार भोजने अन् वनिता खरात एकमेकांच्या मिठीत, हे बघून नवरा म्हणतो, 'हे सगळं...'; Video व्हायरल

'महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) २ फेब्रुवारी रोजी सुमित लोंढेबरोबर लग्नगाठ बांधली. हास्यजत्रेतील अनेक कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली होती. मात्र काही असेही होते जे या लग्नाला येऊ शकले नाहीत. हास्यजत्रेचे जज सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक लग्नाला येऊ शकले नसल्याने त्यांनी याआधीच वनिताची माफी मागितली होती. मात्र आणखी एक कलाकार लग्नात दिसला नाही म्हणून चर्चा सुरु झाली होती, तो म्हणते ओंकार भोजने.

ओंकार भोजने लग्नात दिसला नाही म्हणून उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. वनिता आणि ओंकारमध्ये काही वाद आहे का अशी शंका चाहत्यांना आली होती. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण ओंकार थेट वनिताच्या घरी जाऊन पोहोचला आहे. त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो तुफान व्हायरल होतोय.

घराची बेल वाजते आणि वनिता दार उघडते. समोर ओंकार उभा असतो. दोघेही एकमेकांना पाहताच मिठी मारतात. मात्र अचानक वनिताचा नवरा सुमित लोंढे येतो आणि म्हणतो, 'हे सगळं स्किटमध्ये आता ती माझी बायको आहे.'


 
'लग्नाला येता आलं नाही म्हणून भोजाने डायरेक्ट घरी येऊन सरप्राईजच दिलं, लव्ह यू भोज्या' वनिता आणि ओंकारचा नेहमीप्रमाणेच विनोदी अंदाज दिसत आहे. चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूपच आवडला आहे. दोघांना असं एकत्र बघून चाहते खूप खूश झालेत.

Web Title: onkar bhojne and vanita kharat hug each other as he visits actress at her home