n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">एक था राजा एक थी राणी या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान नुकतीच इशा सिंगला दुखापत झाली. या मालिकेच्या एका दृश्यात जीवनची भूमिका साकारणाऱ्या झान खानला इशाला बेशुद्ध करण्यासाठी तिच्या डोक्यात फुलदाणी मारायची होती. पण चित्रीकरणाच्यावेळी झानने तिला थोडेसे जोरात मारले, त्यामुळे तिचे डोके दुखायला लागले. पण झानने लगेचच यासाठी तिची माफीही मागितली. झान सांगतो, "दृश्याचे चित्रीकरण करताना माझ्याकडून इशाला थोडेसे जोरात मारले गेले. यासाठी मी तिची माफीदेखील मागितली. त्या दृश्याच्या लगेचच पुढच्या दृश्यात इशा मला चावणार होती. पण या दृश्यात ती मला चुकून जोरात चावली. अभिनय चांगला होण्यासाठी कधीतरी अशाप्रकारचा त्रास सहन करावाच लागतो."